jalgaon nagarrachana locked | Sarkarnama

जळगावात नगररचनाला शिवसेनेने ठोकले टाळे 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

जळगावः महापालिका नगररचना विभागात बांधकाम परवानग्या देण्यात नागरिकांना त्रास दिला जात असल्याने संतप्त झालेल्या शिवसेना उपगटनेते अनंत जोशी यांनी नगरसचना विभागाला टाळे लावले, या प्रकरणी प्रशासनातर्फे त्यांच्यावर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

जळगाव महापालिकेत नुकतेच सत्तातर झाले आहे. शिवसेना नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील आघाडीची सत्ता खालसा झाली असून भाजपची सत्ता आली आहे. मात्र उद्या (ता.18) रोजी महापौर, उपमहापौर यांची निवड होणार आहे. 

विरोधी असलेल्या शिवसेनेने गटनेते, उपगटनेते पदही जाहीर केले आहे. पक्षाचे उपगटनेते अंनत उर्फ बंटी जोशी यांनी सकाळी अकरा वाजता त्यांनी थेट पंधराव्या मजल्यावर महापालिका कार्यालयात जावून नगररचना कार्यालयास कुलूप ठोकले, आणि बाहेर ठिय्या दिला. 

याबाबत त्यांचे म्हणणे आहे, की नगरचना विभागात नागरिकांना त्यांच्या घराचे बांधकाम करण्याबाबत विविध परवानग्या घ्यावा लागतात. गेल्या सहा ते आठ महिन्यापासून लहान मोठ्या बांधकाम परवानगीच्या फाईल नागरिकांच्या पेंडीग पडलेल्या आहे. नगररचना सहाय्यक अधिकारी धामणे या फाईलींकडे बघत नाहीत. लवकर परवानगी मिळावी यासाठी अभियंत्यांना नागरिक पैसे देवून देखील फिरवा फिरव हे अभियंते करतात. 

आयुक्तांकडून देखील परवानग्या दिल्या जात नसल्याने नागरिकांचे दररोज या विभागात फेऱ्या मारावे लागत आहेत. आपण जनतेसाठी हा पवित्रा घेतला आहे. या प्रकरणी महापालिका प्रशासनाने या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. 
 
संबंधित लेख