Jalgaon MP A T Patil suffers chiken Guniya | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

जळगावचे खासदार ए.टी.पाटलांना चिकन गुनियाची लागण 

कैलास शिंदे 
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार ए. टी. पाटील यांना चिकन गुनियाची लागण झाली. 

जळगाव : लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार ए. टी. पाटील यांना चिकन गुनियाची लागण झाली असून, त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना आज 'डिस्चार्ज' देण्यात आला. 

गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरासह जिल्ह्यात साथरोगांचे प्रमाण वाढले आहे. त्याचा फटका थेट खासदारांनाही बसला. जळगाव लोकसभा क्षेत्राचे खासदार ए. टी. पाटील यांना गेल्या काही दिवसांपासून अंगदुखीचा त्रास सुरू झाला. त्यांनी पूर्ण तपासणी केली असता चिकन गुनियाचे निदान झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जळगाव येथील डॉ.पराग चौधरी यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

दोन दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना बरे वाटू लागल्याने 'डिस्चार्ज' देण्यात आला. चिकन गुनिया आजारामध्ये शरीरातील सांधे ठणकू लागतात आणि हालचालींवर थोड्या मर्यादा पडू शकतात . त्यामुळे निवडणुका जवळ आलेल्या असताना खासदार श्री . पाटील चिकन गुनियाचा नेहेमीच्या उत्साहाने सामना करतील अशी आशा आहे . 

संबंधित लेख