Jalgaon MLA Suresh Bhole Ganpati | Sarkarnama

आमदार भोळेंना दहा दिवसात 125 आरत्यांचा मान : आमदार सौभाग्यवती करतात दोन तास पूजा

कैलास शिंदे
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

जळगावचे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या घरी आज सकाळी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. घरगुती गणपतीच्या सजावटीची जबाबदारी आमदार भोळे यांचे पुत्र विशाल याच्यावरचे असते. दरवर्षी तोच सजावट करीत असतो. 'गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात गणेशाची स्थापना करण्यात आल्यानंतर आमदार भोळे यांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली.

जळगाव : जळगावचे आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांच्या निवासस्थानी गणेशाची पारंपारिक स्थापना करण्यात येते. आमदार सौभाग्यवती सीमा भोळे या धार्मिक आहेत. त्या दररोज दोन तास देवपूजा करतात. गणेशोत्सवाच्या दहा दिवसाच्या काळातही त्या नित्यनियमाने पूजा करतात. तर आमदार भोळेना दहा दिवसात विविध मंडळातर्फे आरत्यांचे निमंत्रण असते या कालावधीत त्यांना सुमारे 125 आरत्या करण्याचा मान मिळतो.

जळगावचे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या घरी आज सकाळी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. घरगुती गणपतीच्या सजावटीची जबाबदारी आमदार भोळे यांचे पुत्र विशाल याच्यावरचे असते. दरवर्षी तोच सजावट करीत असतो. 'गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात गणेशाची स्थापना करण्यात आल्यानंतर आमदार भोळे यांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली.

गणेशोत्सवाबाबत आपल्या भावना व्यक्त करताना आमदार भोळे म्हणाले, ''गावी राहत असतांना लहानपणापासून घरी गणपतीची होते. जळगावात आल्यानंतरही घरी आम्ही दरवर्षी स्थापना करतो. पत्नी सौ.सीमा या धार्मिक आहेत. दररोज दोन तास त्या घरात देवपूजा करीत असतात. गणेशोत्सव काळातही त्यांची पूजा नियमाने सुरू असते. मुलगा विशाल दररोज सकाळ संध्याकाळ आरती करतो. मला विविध मंडळाचे आरतीचे निमंत्रण असते, दहा दिवसाच्या उत्सवात मला गणेशाच्या 125 आरत्या करण्याचा लाभ मिळतो, हे मी माझे भाग्यच समजतो. मी सार्वजनिक गणेश मंडळातही कार्य केले आहे. त्यावेळी मंडप उभारणीपासून तर डेकोरेशन करण्यापर्यंत रात्री जागून सहकाऱ्याबरोबर कार्य करीत करतो. गणेशोत्सव काळात दहा दिवस उत्साह वेगळाच असतो.''

संबंधित लेख