जळगावच्या महापौरपदी भाजपच्या सीमा भोळे, उपमहापौरपदी अश्‍विन सोनवणे 

जळगाव महापालिकेच्या निवडणूकीत 75 जागापैकी भारतीय जनता पक्षाला तब्बल 57 जागांचे बहुमत मिळाले. तर शिवसेनेला 15 जागा मिळाल्या. एमआयएम ला तीन जागा मिळाल्या आहेत. आज महापौर व उपमहापौर निवडीसाठी जिल्हाधिकारी किशोरराजे निबांळकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यावेळी आयुक्त चंद्रकांत डांगे उपस्थित होते.
जळगावच्या महापौरपदी भाजपच्या सीमा भोळे, उपमहापौरपदी अश्‍विन सोनवणे 

जळगाव : जळगाव महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला असून महापौरपदी सीमा भोळे व उपमहापौरपदी डॉ. अश्‍विन शांताराम सोनवणे 56मतानी विजयी झाले आहेत. शिवसेनेने बहिष्कार टाकला तर एमआयएमचे तीन सदस्य तटस्थ राहिले. भाजपच्या एका नगरसेवकांचा मुलगा आजारी असल्याने ते अनुपस्थित राहिले. 

जळगाव महापालिकेच्या निवडणूकीत 75 जागापैकी भारतीय जनता पक्षाला तब्बल 57 जागांचे बहुमत मिळाले. तर शिवसेनेला 15 जागा मिळाल्या. एमआयएम ला तीन जागा मिळाल्या आहेत. आज महापौर व उपमहापौर निवडीसाठी जिल्हाधिकारी किशोरराजे निबांळकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यावेळी आयुक्त चंद्रकांत डांगे उपस्थित होते. महापौरपदासाठी भाजपतर्फे सीमा भोळे तर शिवसेनेतर्फे जयश्री महाजन तर उपहापौरपदासाठी भाजपतर्फे डॉ. अश्‍विन सोनवणे व शिवसेनेतर्फे प्रमोद नाईक यांनी अर्ज दाखल केला होता.

निवडणुकीवर शिवसेनेने बहिष्कार टाकला. मात्र, उमेदवारी अर्ज कायम ठेवला. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. महापौरपदी सीमा भोळे तर उपमहपौरपदी डॉ. अश्‍विन सोनवणे विजयी झाले. त्यांना 56 मते पडली. विरोधी शून्य मते पडली. शिवसेनेने बहिष्कार टाकला होता. एमआयएमचे तीन सदस्य उपस्थित राहिले मात्र ते तटस्थ राहिले. भाजपच्या एका नगरसेवकांचा मुलगा आजारी असल्यामुळे ते अनुपस्थित राहिले. त्यामुळे भाजपला57 पैकी  56 मते पडली. महापौर सीमा भोळे या भाजपचे जळगावचे आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांच्या पत्नी आहेत. आमदार पती व महापौर पत्नी होण्याची जळगाव महापालिकेत पहिलीच वेळ आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com