jalgaon-girish-mahajan | Sarkarnama

गांधीजी कॉंग्रेसच्या नव्हेच, भाजप विचारांचे : गिरीश महाजन 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

महात्मा गांधींची कॉंग्रेस स्वातंत्र्याच्या अगोदर होती, त्यानंतर त्यांनी कॉंग्रेस विसर्जित करण्यास सांगितली होती. ती विसर्जीत न करता सत्तेसाठी कॉंग्रेस कायम ठेवण्यात आली. त्यामुळे आताची कॉंग्रेस गांधींच्या विचारांची नाही, त्यामुळे गांधीजी कॉंग्रेसचे नाहीत. तर भारतीय जनता पक्षाच्या विचारांचे आहे, असे वाद्ग्रस्त विधान राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव येथे पक्षाच्या बैठकित बोलताना केले. 

जळगाव : महात्मा गांधींची कॉंग्रेस स्वातंत्र्याच्या अगोदर होती, त्यानंतर त्यांनी कॉंग्रेस विसर्जित करण्यास सांगितली होती. ती विसर्जीत न करता सत्तेसाठी कॉंग्रेस कायम ठेवण्यात आली. त्यामुळे आताची कॉंग्रेस गांधींच्या विचारांची नाही, त्यामुळे गांधीजी कॉंग्रेसचे नाहीत. तर भारतीय जनता पक्षाच्या विचारांचे आहे, असे वाद्ग्रस्त विधान राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव येथे पक्षाच्या बैठकित बोलताना केले. 

जळगाव येथील औद्यौगिक वसाहतीतील बालाणी लॉन्स येथे भाजपची जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक होती. जिल्हाध्यक्ष उदय वाघ, खासदार ए.टी.पाटील, आमदार सुरेश भोळे,आदी बैठकिला उपस्थित होते. आगामी निवडणूकांची तयारी तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त पक्षातर्फे आयोजित स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा याची माहिती देण्यासाठी या बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी बोलताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले, गांधी जयंतीनिमित्त पक्षातर्फे 2 ऑक्‍टोबर ते 30 जानेवारीपर्यंत जिल्हयातील सर्व विधानसभा क्षेत्रात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी गांधीजींचे विचार जनतेला समजावून सांगितले पाहिजे. गांधीजी कॉंग्रेसचे असल्याचे सांगितले जाते. स्वातंत्र्यापूर्वी गांधीजींच्या विचारांची कॉंग्रेस होती, स्वतंत्र्यानंतर गांधीजींनी कॉंग्रेस बरखास्त करण्यास सांगितले होते. परंतु सत्तेसाठी कॉंग्रेस गांधीजींचे नाव वापरत आहेत. आताची कॉंग्रेस गांधींच्या विचारांची नाहीच. ते खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या विचारांचे आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांचा चरखा घेवून जनतेत त्यांची विचार सांगावे. प्रत्येक गावागावात जावून गांधींजीच्या विचारांचा प्रचार करावा. 

`पवार मोदी विरूध्द बोलत नाहीत'  
कार्यकर्त्यांना बोलतांना महाजन म्हणाले, की राफेल कराराबाबत मोदींनी गैरव्यवहार केला आहे, यावर कोणाचाही विश्‍वास नाही. कॉंग्रेस विनाकारण आवाज उठवित आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार या विषयी मोदींविरूध्द बोलत नाहीत, मग पक्षाच्या कार्यकर्त्यानी न्यूनगंड बाळगायचा नाही. घाबरायचे बिलकूल नाही. पक्षाने जनतेसाठी केलेल्या कामाचा जोरदार प्रचार करायचा. आगामी काळात येणाऱ्या कोणत्याही निवडणूकीत पक्षाला यश मिळणार हे निश्‍चित आहे.
 

संबंधित लेख