Jalgaon Ex MP Mahajan No More | Sarkarnama

जळगाव भाजपचे माजी खासदार वाय. जी. महाजन यांचे निधन 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

जळगाव लोकसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार वाय.जी.महाजन सर (वय76) यांचे दिर्घ आजाराने खासगी रूग्णालयात निधन झाले. 

जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार वाय.जी.महाजन सर (वय76) यांचे दिर्घ आजाराने खासगी रूग्णालयात निधन झाले. 

यशवंत गिरधर उर्फ वाय.जी.महाजन सर यांनी पुणे विद्यापीठातून बी.एड. केले. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेत त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. नाशिराबाद गटातून जिल्हा परिषद सदस्यपदी भाजपतर्फे निवडून आले. त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही भूषविले.त्यानंतर सन 1999 व 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत ते जळगाव लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले. गेल्या काही दिवसापासून त्यांच्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांचे निधन झाले.
 

संबंधित लेख