jalgaon-eknath-khadse-dcc-bank-meeting | Sarkarnama

शेतकऱ्यांनो या आणि कर्ज घ्या; जळगाव जिल्हा बॅंकेची दारे खुली: खडसे 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅंक आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि मजबूत झाली असून बॅंकेकडे तब्बल तीन हजार कोटीच्या ठेवी आहेत. राज्य सहकारी बॅंकेच्या मदतीशिवाय बॅंक स्वत;च्या भांडवालातून शेतकऱ्यांना कर्ज देण्यात येत आहे. "शेतकऱ्यांनो या आणि कर्ज घ्या'असे अवाहन माजी मंत्री व जिल्हा बॅंकेचे संचालक एकनाथराव खडसे यांनी आज बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलतांना केले. 

जळगाव  : जळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅंक आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि मजबूत झाली असून बॅंकेकडे तब्बल तीन हजार कोटीच्या ठेवी आहेत. राज्य सहकारी बॅंकेच्या मदतीशिवाय बॅंक स्वत;च्या भांडवालातून शेतकऱ्यांना कर्ज देण्यात येत आहे. "शेतकऱ्यांनो या आणि कर्ज घ्या'असे अवाहन माजी मंत्री व जिल्हा बॅंकेचे संचालक एकनाथराव खडसे यांनी आज बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलतांना केले. 

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची वार्षिक सर्वसाधारण सभा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष किशोर पाटील, संचालक गुलाबराव देवकर, ऍड.रविंद्रभैय्या पाटील, तिलोत्तमा पाटील, संजय पवार, आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, नानासाहेब देशमुख, आमदार चंद्रकांत सोनवणे, विष्णू भंगाळे व्यासपीठावर उपस्थित होते. 

जिल्हा बॅंकेच्या स्थितीबाबत माहिती देतांना एकनाथराव खडसे म्हणाले, बॅंकेस यावर्षी 66 कोटी 87 लाख रूपयांचा विक्रमी नफा झालेला आहे. तर भागभांडवालात 2 कोटी 43लाखांनी वाढ झाली आहे. तर बॅंकेच्या 2हजार 987 कोटी रूपयांच्या ठेवी असून त्यात यावर्षी 178 कोटी वाढ झाली आहे.बॅंकेचा एनपीए शून्य आहे. बॅंकेच्या एनपीए शुन्य आहे. कजमाफीचे 1200 कोटी रूपये सरकारकडे थकित आहे.त्यामुळेच बॅंक "ब'वर्गात आहे. अन्यथा बॅंक "अ'वर्गात आहे. बॅंक आज आर्थिकबाबतीत सक्षम आहे. तीन हजार कोटीच्या ठेवी असल्यामुळे बॅंक कर्ज देण्यासाठी तयार "शेतकऱ्यांना या आणि कर्ज घ्या'असे अवाहन आम्ही करीत असेही त्यांनी स्पष्ट केले. 

कर्मचारी भरती करणार 
बॅंकेत कर्मचारी कमी आहेत. त्यामुळे भरती करणे आवश्‍यक आहे. असे मत व्यक्त करून खडसे म्हणाले, कि जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ही बॅंक असल्यामुळे जिल्ह्यातील युवकांसांठीच ही भरती असावी अशी आम्ही शासनाकडे मागणी केली मात्र शासनाने त्यास नकार दिला आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या "एजन्सी'च्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरासाठी आता ही भरती खुली राहणार असून लवकरच त्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. 

शासनाच्या अभिनंदनावरून वाद 
बॅंकेच्या सभेत कर्जमाफीबद्दल शासनाच्या अभिनंदनाचा ठराव उपाध्यक्ष किशोर पाटील यांनी मांडला. मात्र काही शेतकरी सभासदांनी त्याला विरोध केला. शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे आम्ही शासनाचे अभिनंदन करणार नाही असे त्यांनी म्हटले. मात्र एकनाथराव खडसे यांनी शासनाची बाजू घेत जिल्ह्यात 1लाख 87 हजार 86 सभासदांना 734 कोटीची कर्जमाफी देण्यात आली आहे. त्यांनी अगोदर ही कर्जमाफी परत करावी मग विरोध करावा असे मत व्यक्त केले. त्यानंतर गदारोळात बहुमताने कर्जमाफीबद्दल शासनाच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.

संबंधित लेख