jalgaon-Eknath-Khadase-police-Anjali-damania | Sarkarnama

गृहखाते सक्षम नसल्यानेच अंजली दमानियांचे  पोलिसांना आव्हान : खडसे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 जून 2018

अंजली दमानिया यांच्याविरूध्द गुन्हे दाखल असतानाही त्या जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात जावून त्यांना अटक करण्याचे थेट आव्हान देतात. पोलिसही त्यांना अटक न करता सोडून देतात. केवळ राज्यातील गृहखाते सक्षम नसल्यामुळेच हे धाडस होत आहे, असा आरोप राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी जळगावात पत्रकारांशी बोलताना केला. 

जळगाव : अंजली दमानिया यांच्याविरूध्द गुन्हे दाखल असतानाही त्या जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात जावून त्यांना अटक करण्याचे थेट आव्हान देतात. पोलिसही त्यांना अटक न करता सोडून देतात. केवळ राज्यातील गृहखाते सक्षम नसल्यामुळेच हे धाडस होत आहे, असा आरोप राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी जळगावात पत्रकारांशी बोलताना केला. 

याबाबत खडसे यांनी सांगितले, की अंजली दमानिया यांनी ट्विटद्वारे आपण न्यायालयावर दबाव आणला, असा मेसेज टाकून आपली बदनामी केली आहे. तसेच न्यायालयाचाही अवमान केला आहे. या प्रकरणी आपण दमानिया यांच्याविरूध्द फौजदार मानहानीचा दावा न्यायालयात दाखल केला आहे.
 
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अपसंपदा जमाविल्याचा आरोप केल्याप्रकरणी दमानिया यांनी आरोप केला होता. मात्र यात पुरावा म्हणून सादर केलेला डी.डी.व धनादेश बनावट असल्याची तक्रार खडसे यानीं न्यायालयात केली होती. न्यायालयाच्या आदेशावरून दमानियांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी दमानिया दोन दिवसांपूर्वी जळगावात आल्या होत्या. जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात जावून त्यांनी आपल्याला अटक करावी अशी मागणी केली होती. मात्र पोलिसांना त्यांना अटक केली नाही. 
राजकारणाच्या बित्तंबातम्यांसाठी डाऊनलोड करा sarkarnama अॅप 

संबंधित लेख