जळगाव महापालिकेत जतूंनाशक फवारणीचा 22 लाखाचा साठा पडून

शहरात जंतूनाशकाची फवारणी करण्यासाठी आलेला 22 लाख रूपयाचा साठा न वापरता तसाच पडून आहे. स्थायी समिती सभापती वर्षा खडके व भाजप नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी गोडावूनची पाहणी केल्यानंतर ही बाब उघड झाली आहे.
जळगाव महापालिकेत जतूंनाशक फवारणीचा 22 लाखाचा साठा पडून

जळगाव : 'आंधळ दळतय अन कुत्रं पीठ खातंय', अशी स्थिती जळगाव महापालिकेची झाली आहे. महापालिकेवर हुडको व जिल्हा बॅंकेचे कर्ज असल्यामुळे निधीसाठी सफाईची कामे रखडली आहेत. दुसरीकडे प्रभारी आयुक्त जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर सकाळी पदयात्रा करून स्वच्छतेची पाहणी करीत आहेत., अशा स्थिती आरोग्यविभागाचा आणखी एक गलथानपणा उघडकीस आला आहे.

शहरात जंतूनाशकाची फवारणी करण्यासाठी आलेला 22 लाख रूपयाचा साठा न वापरता तसाच पडून आहे. स्थायी समिती सभापती वर्षा खडके व भाजप नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी गोडावूनची पाहणी केल्यानंतर ही बाब उघड झाली आहे. जळगाव महापालिकेची अवस्था कर्जामुळे बिकट आहे. निधीसाठी शासनाकडे वेळोवेळी मागणी करण्यात येत असतांना दुसरीकडे आरोग्यविभागाकडे साहित्य येवूनही त्यांचा वापर होंत नसल्याचे दिसून आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे बालगंधर्व खुले नाट्यगृहात गोडावून आहे, त्या ठिकाणी आरोग्य विभागाचे साहित्य आहे. त्याची पाहणी आज स्थायी समिती सभापती वर्षा खडके व भाजप नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी अचानकपणे केली. त्यावेळी या ठिकाणी शहरात जंतू नाशक फवारणीचा तब्बल 1800 लीटर साठा आढळून आला.

विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यापासून तो आला आहे. पाच महिन्यात केवळ पाच लिटरच जंतूनाशक वापरण्यात आले आहे. शहरातील कोणत्याच प्रभागात त्याचा वापर झालेला नाही. जळगाव शहरात घाणीचे साम्राज्य आहे. नागरिकांच्या वेळोवेळी तक्रारी येत असतांना लाखो लिटरचा हा साठा वापराविनाच पडून असल्याचे आढळून आले आहे. स्थायी समिती सभापती वर्षा खडके यांनी आरोग्यधिकारी डॉ.विकास पाटील यांना विचारणा केली असता, त्यानीं सांगितले की, आपण आरोग्यनिरिक्षकांना जंतूनाशक फवारणी करण्यासाठी घेवून जाण्यास सांगितले परंतु, त्यांनी तो नेलेला नाही. केमिकल सोबतच जळगाव महापालिकेने व्यापारी संकुलात ठेवण्यासाठी मागविलेल्या कचरा कुंडयाही पडलेल्या या ठिकाणी आढळून आल्या आहेत. या निष्काळजीपणा बद्दल संबधित अधिकाऱ्यावर कारवाईची शिफारस स्थायी समिती वर्षा खडके यांनी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com