प्रदीप जैस्वाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

 प्रदीप जैस्वाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

औरंगाबाद : दंगल प्रकरणातील दोघा तरुणांना जामिनावर सोडण्याच्या मागणीसाठी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गोंधळ घालणारे शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी ए. व्ही. खारकर यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर जैस्वाल यांनी दाखल केलेला नियमित जामिन अर्जही न्यायालयाने फेटाळला. 

शहरात झालेल्या दंगल प्रकरणी पोलिसांनी अटक सत्र सुरू केले आहे. शिवसेनेच नगरसेवक राजेंद्र जंजाळ, शिवसैनिक लच्छू पहेलवान यांच्यासह 72 जणांना पोलिसांनी अटक केली होती. यापैकी गांधीनंगर येथील दोघा तरूणांना जामीनावर का सोडत नाही ? असा जाब विचारण्याठी प्रदीप जैस्वाल रविवारी (ता. 20) रात्री बारा वाजेच्या सुमारास क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी तेथे उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी जैस्वाल यांची वादावादी झाली. यात जैस्वाल यांनी टेबलवरील काच फोडत, खुर्च्यांचीही मोडतोड केली. शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी पोलीसांनी जैस्वाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. 

सोमवारी दुपारी प्रदीप जैस्वाल यांना पोलिसांनी त्यांच्या निराला बाजार येथील घरातून अटक केली. आधी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात, त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात नेले. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी ए. व्ही. खारकर यांनी जैस्वाल यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. जैस्वाल यांच्या वकिलांनी तात्काळ नियमित जामीनासाठी अर्ज केला पण तो न्यायालयाने फेटाळला. जंजाळ, लच्छू पहेलवान यांच्यानंतर प्रदीप जैस्वाल यांच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईने सध्या शिवसेनेत पोलीसांच्या विरोधात संतापाचे वातावरण आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com