जैन मुनी अतिरेकी, त्याला ठेचले पाहिजे

जैन मुनी अतिरेकी, त्याला ठेचले पाहिजे

मुंबई : जैन मुली जिहादच्या बळी पडत आहे. त्याकडे जैन मुनींनी खरे तर लक्ष देण्याची गरज आहे. तसे न होता हे मुनी भाजपचा प्रचार करीत असून जैन मुनीची वागणूक ही झाकीर नाईक सारखी झाली आहे.जैन मुनी अतिरेकी असून त्याला ठेचले पाहिजे, असा घणाघात शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी आज भाजपवर केला. 

मीरा भाईंदरमध्ये भाजपने मिळविलेल्या विजयानंतर आज राऊत यांनी पत्रकार परिषद घेत थेट मित्र पक्ष असलेल्या भाजप आणि त्यांच्या नेत्यांना लक्ष्य केले. संजय राऊत म्हणाले, की मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने मनी आणि जैन मुनींच्या जीवावर विजय मिळविला आहे असे माझे ठाम मत आहे. 
या निवडणुकीत भाजपने 95 पैकी 60 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवीत एकहाती सत्ता मिळविली होती. मीरा-भाईंदरमध्ये जैन धर्मीयांची संख्या अधिक आहे. जैन मुनी भाजपचा प्रचार करतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे भाजपच्या विजयाबद्दल विरोधी पक्षांकडून टीका करण्यात येत होती. 

भाजपने मिळविलेला हा विजय मनी आणि मुनींच्या जीवावरचा आहे. जैन मुनींनी भाजपचा प्रचार केला. जैन मुनींनी जातीच्या आधारावर मते मागितली. त्यांच्या जोरावर भाजपने निवडणूक जिंकली. जैन मुलींना लव्ह-जिहादमध्ये फसविले जात आहे. त्या जैन मुनीची वागणूक ही झाकीर नाईकसारखी आहे. त्या जैन मुनीविरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. जैन, गुजराथी समाज शिवसेनेला मतदान करत होता. पण, भाजपने जैन मुनींचा वापर प्रचारासाठी केला. या समाजांना आमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न केला गेला असेही संजय राऊत यावेळी म्हणाले. 

भाजप नेते आणि जैन मुनी यांनी प्रचार दरम्यान केलेल्या जातीयवादी प्रचाराच्या व्हिडीओ आपल्याकडे असून शिवसेना निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचे ते म्हणाले. 
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com