जगदाळेंच्या आमदारकीच्या जाहीर इच्छेने भरणे व माने चपापले

जगदाळेंच्या आमदारकीच्या जाहीर इच्छेने भरणे व माने चपापले

वालचंदनगर : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी आज निरवांगी (ता.इंदापूर) जवळील दगडवाडी येथील नंदिकेश्‍वराच्या साक्षीने थेट विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने राष्ट्रवादीमध्ये आमदारकीच्या तिकिटासाठी स्पर्धा सुरु झाली आहे.

विधानसभेच्या निवडणूकीला एक वर्षे अवधी आहे. मात्र आतापासुन तालुक्यातील वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे. आमदार दत्तात्रेय भरणे यांनी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा घेवून शक्तीप्रदर्शन केले. यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये मध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आला.

आज (सोमवार) थेट जगदाळे यांनी मला जिल्हा बॅंकेचे चेअरमन वैगरे व्हायंच नसुन आमदारकी लढविण्याचे असल्याचे सांगून विधानसभेच्या निवडणूकीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले. गेल्याच आठवड्यामध्ये नागपंचमी निमित्त जगदाळे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना सराटीमध्ये बोलवून अप्रत्यक्ष शक्तीप्रदर्शनच केले होते. तसेच 2009 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये आमदार भरणे, जगदाळे, दशरथ माने, यांनी महाआघाडी करुन हर्षवर्धन पाटलांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला अपयश आले. 2014 मध्ये जगदाळे विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते.मात्र त्यांना 2019 च्या वेळी संधी देणाचे आश्‍वासन पक्षाने दिल्याची चर्चा चार वर्षापासुन सुरु आहे.
 
अंथुर्णेमधील मेळाव्यामध्ये खासदार सुळे यांनी पवार साहेबांचे तालुक्यात सर्वात जास्त प्रेम माने दादांवर असल्याचे सांगून माने कुटुंबाच्या पारड्यामध्ये वजन टाकले होते. तसेच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे ज्‍येष्ठ नेते शरद पवार व सोनाई परिवारचे अध्यक्ष दशरथ माने यांचे ही सलोख्याचे संबध आहेत. जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी ही तालुक्यामध्ये दीड वर्षाच्या कालावधीमध्ये 58 कोटी रुपयांचा भरघोस निधी आणला असुन ते विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रवादीमधून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी आमदार भरणे,सभापती जगदाळे व सभापती प्रवीण माने इच्छुक असून आगामी काळामध्ये उमेदवाराची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे 2019 कळणार आहे. तोपर्यंत जगदाळे यांनी जाहीर इच्छा व्यक्त केल्याने पक्षात खळबळ माजली आहे.

राज्यामध्ये राष्ट्रवादी व काॅग्रेस पक्षामध्ये आघाडी होण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही पक्षाची आघाडी झाल्यास इंदापूर तालुक्याची जागा कोणत्या पक्षाकडे जाणार हे ही महत्वाचे आहे. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा राज्याच्या राजकारणामध्ये दबदबा आहे.ते आघाडी झाल्यास कॉग्रेस पक्षासाठी जागा सहज खेचून आणू शकतात.तर आमदार भरणे हे विद्यमान आमदार असल्याने राष्ट्रवादी इंदापूरच्या जागेवरती दावा करणार असल्याने जागा नेमकी कोणाला मिळणार, याचीही उत्सुकता आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com