jadhav mla and palika | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

...जेव्हा निधी खर्च करण्यास हर्षवर्धन जाधव यांना परवानगी नाकारली जाते

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : कॉंग्रेसच्या ताब्यात असलेलेल्या कन्नड नगरपालिकेने मतदारसंघाचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांना शहरात आमदार निधीतून विकासकामे करण्यास नकार दिला आहे. पाच महिन्यापुर्वी जाधव यांनी 40 लाखांच्या आमदार निधीतून काही वॉर्डामध्ये रस्ते, नाल्या व इतर कामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. परंतु अद्याप कन्नड नगरपालिकेने आमदार निधी खर्च करण्यासाठी एनओसीच दिली नसल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितले. 

औरंगाबाद : कॉंग्रेसच्या ताब्यात असलेलेल्या कन्नड नगरपालिकेने मतदारसंघाचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांना शहरात आमदार निधीतून विकासकामे करण्यास नकार दिला आहे. पाच महिन्यापुर्वी जाधव यांनी 40 लाखांच्या आमदार निधीतून काही वॉर्डामध्ये रस्ते, नाल्या व इतर कामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. परंतु अद्याप कन्नड नगरपालिकेने आमदार निधी खर्च करण्यासाठी एनओसीच दिली नसल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितले. 

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून कन्नड-सोयगांव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला होता. त्यानंतर जाधव यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्ष हा स्वतंत्र पक्ष काढत आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. लोकसभा लढवून दिल्लीत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांना निवडणुकी आधी आपल्याच मतदारसंघात वाईट अनुभव आला. 

आमदार निधीतून मतदारसंघात विकासकामे करण्यास जाधव यांना नगरपालिकेने परवानगीच दिलेली नाही. पाच महिन्याआधी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र दिल्यानंतरही कामे का होत नाही याची माहिती घेण्यासाठी हर्षवर्धन जाधव आज कन्नड नगरपालिकेच्या कार्यालयात गेले होते. यावेळी आलेला अनुभव सांगतांना जाधव म्हणाले, कन्नड शहरातील वार्ड क्रमांक 5 आणि 8 मध्ये रस्ते, गटार आणि इतर विकासकामे आमदार निधीतून करण्यासाठी मी चाळीस लाखांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्राद्वारे कन्नड नगरपालिकेला दिला होता. 

जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही नगरपालिकेला ते पत्र प्राप्त झाले. पण पाच महिने उलटून गेले तरी कामाला सुरूवात का झाली नाही ? हे जाणून घेण्यासाठी मी आज मुख्यकार्यकारी अधिकारी नंदा गायकवाड यांना भेटलो आणि विचारणा केली. तेव्हा त्यांनी मला दिलेले उत्तर ऐकून मी चकितच झालो. कुठलाही विकासनिधी शहरात खर्च करण्यासाठी एनओसी द्यायची नाही असा ठराव नगरपालिकेने घेतलेला आहे असे त्यांनी मला सांगितले. विकासनिधी खर्च करायचा नाही असा ठराव नगरपालिका कसा काय घेऊ शकते? त्यामुळे मी सीईओ मॅडमला या ठरावाची प्रत मला द्या अशी मागणी केली. तेव्हा ठरावाची प्रत नगराध्यक्षांच्या घरी आहे, त्यामुळे आता तुम्हाला देऊ शकत नाही असे सांगत मी बसलेलो असतांना माझी वेळ झाली असे सांगून त्या निघून गेल्या. 

मी आमदार आहे की कोण? 
मी दिलेला राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी मंजुर केलेला नाही. त्यामुळे मला आमदार म्हणून सभागृहात बसावे लागेल, मतदारसंघातील प्रश्‍न मांडावे लागतील. अशा वेळी एका आमदाराला नगरपालिकेच्या सीईओकडून अशा प्रकारची वागणूक पाहून मी थक्क झालो. जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर मी हा प्रकार घातला तेव्हा त्यांनी असा जर काही ठराव नगरपालिकेने घेतला असले तर तो आपल्याला राज्य सरकारकडून रद्द करून घ्यावा लागेल असे त्यांनी मला सांगितले. परंतु विकास निधी खर्च करण्यासाठी परवानगी देऊ नका असा ठराव नगरपालिकेने केला यावर माझा अजूनही विश्‍वास बसत नाहीये. म्हणून ठरावाची प्रत मिळेपर्यंत मी नगरपालिका कार्यालयातून न जाता उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. नगरपालिकेने जर खरचं असा ठराव घेतला असेल तर त्याची प्रत घेऊन मी हा प्रश्‍न सोमवारी विधानसभेत मांडणार असल्याचेही हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले. 
 

संबंधित लेख