jadhav harshvardhan mla | Sarkarnama

मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा, नाहीतर आमदारकीचा राजीनामा देणार - हर्षवर्धन जाधव

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 जुलै 2018

औरंगाबाद : सरकारने उद्या संध्याकाळपर्यंत मराठा आरक्षणा संदर्भात अध्यादेश काढावा, अन्यथा मी माझ्या विधीमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे देईन असा इशारा कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिला आहे. मराठा समाजाला अध्यादेश काढून आरक्षण जाहीर करावे यासह अन्य मागण्यांसाठी हर्षवर्धन जाधव यांनी आज (ता.24) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

हर्षवर्धन जाधव म्हणाले, दोन वर्षापासून विधीमंडळात मराठा आरक्षणा संदर्भात चर्चा सुरू आहे, पण त्यातून काही विशेष निष्पन्न होत नाहीये. मराठा आरक्षणाच्या मागणीतून काल एका तरूणाने आत्महत्या केली त्यामुळे या संपुर्ण प्रकरणाला गंभीर वळण प्राप्त झाले आहे. अशा परिस्थीतीत सरकारने तातडीने अध्यादेश काढावा आणि मराठा आरक्षण जाहीर करावे. अध्यादेश काढण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. त्याचे कायद्यात रुपांतर करतांना विधानसभेत विरोध झाला किंवा काही अडचणी आल्या तर त्यावर मार्ग काढता येऊ शकेल. त्यामुळे शासनाने तात्काळ अध्यादेश काढावेत, त्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही अशा इशारा देखील हर्षवर्धन जाधव यांनी प्रशासनाला दिला. 

आमच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी एका दिवसात पन्नास अध्यादेश काढले होते. त्याचे कायद्यात रुपांतर झाले की नाही, त्यात काय कोर्टबाजी झाली हा वेगळा विषय आहे. त्यामुळे सरकारला काही भिती वाटत असेल तर त्यावर विधानसभेत चर्चा होऊ शकते. पण सध्या तातडीने महाराष्ट्र सरकारने आपल्या अधिकारात मराठा, धनगर, मेवाती आरक्षणा संदर्भात जीआर काढावा असा पुनरुच्चार हर्षवर्धन जाधव यांनी केला. तसेच कालच्या आंदोलनात मरण पावलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना कन्नड मतदारसंघा तर्फे पाच लाखांची आर्थिक मदत देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

संबंधित लेख