it`s deram of CM to win baramati : Misal | Sarkarnama

बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचे फडणविसांचे स्वप्न : आमदार मिसाळ 

दत्ता भोंगळे
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

गराडे : बारामती लोकसभा मतदारसंघातील सहापैकी काही तालुक्यांत पवारविरोधी वातावरण आहे. मागील निवडणुकीत महादेव जानकर यांना निसटत्या मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. पण यावेळी मात्र आपती सत्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचे आणि ते आपल्याला पूर्ण करावयाचे आहे, असे आवाहन बारामती लोकसभा मतदार संघाच्या भाजपच्या प्रभारी व पुण्याच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितले.
 
सासवड ( ता. पुरंदर ) येथील दादा जाधवराव सांस्कृतिक भवनात बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर, वेल्हा, मुळशी व पुरंदर या चार तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी माधुरी मिसाळ यांचा सत्कार तालुक्याच्या वतीने करण्यांत आला. 

त्या म्हणाल्या की सध्या होत असलेल्या बैठका भविष्यातील निवडणुका जिंकण्यासाठी आहेत. तेव्हा कोण पदाधिकारी किंवा कोण कार्यकर्ता याविषयी जास्त खोलात न जाता सर्वजणच पदाधिकारी आहेत, असे समजून काम करावे. आपल्या हातात सत्ता आहे. सत्तेतून सत्ता मिळवायची आहे. तेव्हा सर्वांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे.

प्रत्येक तालुक्यात असणाऱ्या पक्षाच्या संघटना यांच्या माध्यमातून आपल्याला पक्षाची असणारी बांधिलकी मानणाऱ्या लोकांना एकत्र करावयाचे असून या लोकांनी गावातील बुथपर्यंत आपला विस्तार व आपल्या पक्षाचा विचार पहचविला पाहिजे. ज्या लोकांना विविध शासकीय माध्यमातून मदत केली आहे अशा सर्वांच्या संपर्कात आपल्याला राहावयाचे असून कोणत्याही परिस्थितीत बारामती मधील आपला उमेदवार हा विजय झालाच पाहिजे, असे शिवाजीराव भुजबळ यांनी सांगितले.

एकविसाव्या शतकात आपला नेते मोदीसाहेब आहेत. प्रत्येकाने नवीन मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करावेत असे रवी अनासपुरे यांनी सांगितले. बैठकीचे आयोजन सासवड शहर अध्यक्ष साकेत जगताप आदींनी केले. प्रास्ताविक बाळासाहेब गरुड यांनी केले. आभार धनंजय कामठे यांनी मानले.
 
संबंधित लेख