IT notices to Bandal`s friends | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

आलिशान गाड्या वापरल्या बांदलांनी; गाड्यांचे "मालक' मात्र नोटिसांचे धनी!

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या घरावर प्राप्तिकर खात्याचा छापा पडल्याने शिरूर तालुक्‍यातील प्रत्येकाच्या तोंडी तोच विषय आहे. त्यांच्या घरात चार किलो सोने सापडल्याचे सांगण्यात येते.

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या घरावर प्राप्तिकर खात्याचा छापा पडल्याने शिरूर तालुक्‍यातील प्रत्येकाच्या तोंडी तोच विषय आहे. त्यांच्या घरात चार किलो सोने सापडल्याचे सांगण्यात येते.

आपल्या श्रीमंती थाटाबद्दल प्रसिद्ध असलेल्या बांदल यांच्या नावावर एकही गाडी नसल्याचे या छाप्यात लक्षात आले. बांदल फिरताना तर भव्य गाड्यांत दिसायचे. बांदल यांची स्वतःची अशी "लाइफ स्टाइल' आहे. या "लाइफ स्टाइल'मध्ये आलिशान गाड्यांचाही समावेश आहे. दर दिवशी वेगळ्या गाडीत ते फिरताना दिसायचे. प्रत्यक्षात वापरत असलेल्या आलिशान गाड्या या त्यांच्या मित्रांच्या नावावर होत्या. या मित्रांकडे आलिशान गाडी आली कोठून, याचा शोध इन्कम टॅक्‍स खाते घेत आहे. त्यामुळे बांदल यांच्या जवळपास 16 मित्रांकडे खात्याने चौकशी सुरू केली आहे. 

साधारण अडीच कोटींची रोल्स राइस, सव्वा कोटीची मर्सिडीस, सव्वा कोटीची बीएमडब्ल्यू, 55 लाखांची जॅगवार, 70 लाखांची ऑडी, 30 लाखांच्या दोन फॉर्चुनर, टू-सिटर फोरव्हिलर अशा गाड्यांमध्ये ते दिसायचे. "रोल्स राइस' ही गाडी संपूर्ण शिरूर तालुक्‍यात बांदल यांच्यासह दोघेच जण वापरताना दिसायचे. त्यामुळे तो देखील अनेकदा चर्चेचा विषय व्हायचा. मात्र या गाड्यांचे "मालक' वेगळेच असल्याने प्राप्तिकर विभागाचे अधिकारीही चक्रावून गेले. त्यामुळे काही टिमना या "मालकां'च्या घरांची झडती घेण्यासाठी पाठविण्यात आले. 

काहींच्या घराला नीट कौले नाहीत, ते मात्र फॉर्च्युनरचे मालक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या संबंधितांनाही आपण ही गाडी "खरेदी' कशी केली हे सांगताना बोबडी वळाली आहे. बांदल यांच्यावरील छाप्यामागे राजकीय डाव आहे का, अशीही कुजबूज तालुक्‍यात आहे. बांदल यांचे भाजपमधील अनेक वरिष्ठ नेत्यांशी चांगला संपर्क आहे. त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. हे जाहीर केल्यानंतर दोनच दिवसांत त्यांच्यावर छापा पडला. 

बांदल हे सन 2005 च्या सुमारास साध्या घरात राहत होते. आता बांदलांचा शिक्रापूरपासून जवळच असलेल्या बुरुंजवाडी गावानजीकची चार एकरातील "हवेली' ही फक्त शिरूरमध्येच नव्हे तर जिल्ह्यात चर्चेत होती. या बंगल्यात हेलिपॅडची सोय बांदल यांनी केली आहे. त्यांच्या या मोठ्या बंगल्याचे काम मात्र रखडलेले आहे. घरगड्यांपासून ते कार्यकर्त्यांच्या निवासापर्यंत प्रत्येकाचे राहण्याचे कसे नियोजन केले आहे, हे बांदल या पूर्वी अनेकांना आवर्जून दाखवायचे. या ंबंगल्यातील नियोजित हॉलमध्ये संपूर्ण ट्रक वळवला जाऊ शकतो, इतका मोठा बांधून तयार आहे.

संबंधित लेख