irraphan khan deasease | Sarkarnama

दुर्मिळ आजाराने  इरफान खान त्रस्त

सकाळ न्यूज नेटवर्क 
मंगळवार, 6 मार्च 2018

मुंबई ः अभिनेता इरफान खान अनेक दिवसांपासून चित्रीकरणापासून दूर आहे. त्याला काविळ झाल्याचे सांगण्यात येत होते; पण इरफानने ट्विट करून आपल्याला दुर्मिळ आजार झाल्याचे सांगितले. आजाराचे योग्य निदान झाले, की ते जाहीर करणार असेही त्याने स्पष्ट केले.

त्याने ट्विटरवर म्हटले आहे, की "तुम्हाला कधी-कधी अचानक धक्कादायक अशी बाब कळते आणि तुम्ही झोपेतून ताडकन जागे होता. 15 दिवसांपासून माझ्या आयुष्यातही असेच काही घडले आहे, ज्याचा पत्ता मलाही लागत नाही. माझा नेहमीच दुर्मिळ गोष्टींसाठी असलेला शोध एके दिवशी मलाच झालेला दुर्मिळ आजार बनून माझ्या समोर येईल, असे मला वाटले नव्हते. पण; मी शेवटपर्यंत लढेन. माझे कुटुंबीय आणि मित्र नेहमीच माझ्यासोबत आहेत. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच मला झालेल्या आजाराबाबत जाहीरपणे सांगेन. तोपर्यंत चांगल्यासाठीच आशा करू.' 

संबंधित लेख