iran attack | Sarkarnama

इराण हादरले, संसदेवर  दहशतवादी हल्ला, तीन जखमी 

वृत्तसंस्था
बुधवार, 7 जून 2017

तेहराण : दहशतवादी हल्ल्याने इराणला जोरदार धक्का बसला आहे. काही अज्ञात काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी थेट संसदेवरच हल्ला केला असून त्यात तीन जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. संसदेच्या आवारात घुसून हा बेछूट गोळीबार करण्यात आला. 

हल्लेखोरांनी काही लोकांना ओलीस ठेवल्याचंही बोललं जात आहे. इराणच्या लष्करानं संसद परिसराचा ताबा घेतला आहे. इराणी लष्कर आणि हल्लेखोरांत चकमक सुरू आहे. 

स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेवरील हल्ल्यात दोन नागरिक तर एक सुरक्षा अधिकारी जखमी झाला आहे. हल्लेखोरांमध्ये तिघांचा समावेश असून त्यांच्यापैकी दोघांकडं एके- रायफल व एकाकडं हॅंडगन आहे. हल्ल्यात मारल्या गेलेल्या सुरक्षा अधिकाऱ्याचा मृतदेह संसदेच्या आवारातून बाहेर काढण्यात आला आहे. ओलीस ठेवण्यात आलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी इराणी लष्कराने कारवाई सुरू केली आहे. हा हल्ल्यामागे नेमकी कोणती दहशतवादी संघटना आहे हे समजू शकले नाही. भारतासह इतर देशाप्रमाणे दहशतवादाने आता इराणमध्ये प्रवेश केला आहे. 
 
संबंधित लेख