ips vishvas nangare patil give example of chakan riot | Sarkarnama

चाकणला कॉ. भास्कर मरता मरता वाचला, तसे कोल्हापुरात करु नका : नांगरे पाटील 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

"चाकणमधील तणाव हाताळण्यास गेलो होतो. कॉन्स्टेबल अजय भास्कर याच्या डोक्‍यात रॉड घातला गेला. तो मरता मरता वाचला. अशा घटना कोल्हापुरात घडू नयेत', अशी अपेक्षा विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी व्यक्‍त केली. 

कोल्हापूर : "चाकणमधील तणाव हाताळण्यास गेलो होतो. कॉन्स्टेबल अजय भास्कर याच्या डोक्‍यात रॉड घातला गेला. तो मरता मरता वाचला. अशा घटना कोल्हापुरात घडू नयेत', अशी अपेक्षा विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी व्यक्‍त केली. 

#MarathaReservation 

9 ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर नांगरे पाटील यांनी समन्वय बैठक घेतली. मराठे लढाईत जिंकतात, पण तहात हारतात, असा दाखला देत सकल मराठा समाजाने आंदोलनाबाबत सकारात्मक विचार करावा, अशी विनंती श्री. नांगरे-पाटील यांनी केली. आंदोलकांनी आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमिका घेतली. चाकणमधील तणाव हाताळण्यास गेलो होतो. कॉन्स्टेबल अजय भास्कर याच्या डोक्‍यात रॉड घातला गेला. तो मरता मरता वाचला. अशा घटना कोल्हापुरात घडू नयेत, असे आवाहनही नांगरे-पाटील यांनी केले. 

यावेळी दिलीप देसाई म्हणाले, "नऊ ऑगस्टला कोणतीही तोडफोड होणार नाही. आपल्या माणसांना त्रास होईल, असे कोणतेच वर्तन आम्ही करणार नाही. पोलिस प्रशासनाने कायदा राबवावा. आम्ही तो पाळतो.'' 

कर्नाटक पोलिसांचा मराठ्यांवर राग आहे. नऊ ऑगस्टला तेच आंदोलनास गालबोट लावतील. मराठ्यांना ठोकून काढतील. त्यांची व्हॅन आम्ही पाहिली आहे. त्यांना बंदोबस्तासाठी कोल्हापुरात आणू नका, अशी विनंती देसाई यांनी यावेळी केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख