ips vishvas nangare patil about 9 aug agitation | Sarkarnama

#MarathaReservation पोलिसांना 9 ऑगस्टच्या 'महाराष्ट्र बंद'ची भीती : नांगरे पाटील 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

कोणतेही गालबोट न लावता नऊ ऑगस्टचा बंद कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने यशस्वी करत राज्याला आदर्श घालून द्यावा.

- IPS विश्‍वास नांगरे-पाटील 

कोल्हापूर : "पूर्वीचा मोर्चा मूक होता. आता ठोक झाल्याने पोलिस प्रशासनाला नऊ ऑगस्टच्या महाराष्ट्र बंदची भीती आहे. पंधरा ते पंचवीस वयोगटातील तरुण ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. सोशल मीडियावर अफवा पसरत आहेत. त्यामुळे नऊ ऑगस्टचा बंद शांततेत होईल, याची खबरदारी घ्यायला हवी', असे मत वशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी व्यक्‍त केले. 

सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी व पोलिस प्रशासनाच्या बैठकीत ते बोलत होते. मुस्लिम बोर्डिंगमध्ये ही बैठक झाली. 

बैठकीत बोलताना इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी आमचा भ्रमनिरास केला आहे. ते चुका करून पुन्हा पुन्हा माफी मागत आहेत. चार वर्षे झाले तरी आरक्षण दिलेले नाही. आम्ही 84 पुरावे दिले आहेत. उलट मुख्यमंत्री आमच्यातच फूट पाडत आहेत. त्यांच्यावर आमचा विश्‍वास नाही. त्यांना आमचा संयम पाहायचा आहे काय? तेच न्यायालयाचे निर्णय कसे काय देतात? त्यांची वक्तव्ये संभ्रम निर्माण करणारी आहेत. आरक्षणासाठी तरुणांच्या आत्महत्या होत असताना एकही शासकीय प्रतिनिधी त्यांच्या कुटुंबीयांकडे फिरकलेला नाही. आम्हाला शासनाबरोबर चर्चा करायची नाही.'' 

संबंधित लेख