ips tejaswi satpute press conference | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

कारवायांचा स्टंट करणे ही माझ्या कामाची पद्धत नाही!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 4 मार्च 2019

सहकाऱ्यांवर विश्‍वास ठेवणे हा माझा स्वभाव आहे.

सातारा : गेल्या काही वर्षामध्ये सातारा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती मुळ धरायला लागल्याचे समोर आले आहे. तत्कालीन पोलिस अधिक्षकांनी योग्य त्या कारवाया करून या प्रवृत्तींवर जरब बसविण्याचे काम केले आहे. कारवायांचा केवळ स्टंट करणे ही माझ्या कामाची पद्धत कधीच असणार नाही, असे स्पष्ट मत नूतन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी व्यक्त केले.

पदभार स्विकारल्यानंतर आज पहिल्यांदा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपली भुमिका स्पष्ट केली. श्रीमती सातपुते म्हणाल्या, सातारा हा तसा शांत जिल्हा आहे. परंतु, गेल्या काही वर्षामध्ये जिल्ह्याच्या काही भागांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती मुळ धरायला लागल्याचे समोर आले आहे. तत्कालीन पोलिस अधिक्षकांनी त्या-त्या वेळी योग्य त्या कारवाया करून या प्रवृत्तींवर जरब बसविण्याचे काम केले आहे. कारवायांचा केवळ स्टंट करणे ही माझ्या कामाची पद्धत कधीच असणार नाही. सर्व सहकाऱ्यांना व सातारकर नागरिकांना सोबत घेऊन कायद्यानुसार योग्य तीच भुमिका घेतली जाईल. घटना हा पोलिस दलाचा धर्मग्रंथ आहे. कायद्याचे जे सांगितले आहे त्याच पद्धतीने निष्पक्ष पद्धतीने काम केले जाईल. कोणाच्याही दबावातून किंवा प्रभावावरून कोणतेही काम होणार नाही.

सहकाऱ्यांवर विश्‍वास ठेवणे हा माझा स्वभाव आहे. कोणाशीही पूर्वग्रह दूषीतपणे मी वागणार नाही. हुकमशाही पद्धतीने काम करून घेण्याऐवजी टिमवर्कने काम चांगले होते हा माझा विश्‍वास आहे. परंतु, जाणीव पूर्वक कोणी कायद्याच्या व पोलिस दलाला अपेक्षीत नसलेली कृत्य करत असेल तर, कोणालाही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 
 

संबंधित लेख