ips jyotipriyasingh efficiency gives smille to NRI | Sarkarnama

IPS ज्योतिप्रियासिंह यांच्या कार्यशैलीचा अमेरिकास्थित कुटुंबाला सुखद अनुभव

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पुणे : पोलिस खात्याबद्दल अनेकदा टिकेचे सूर निघतात. मात्र एखादा कार्यक्षम अधिकारी सुखद अनुभव देऊ शकतो, हे स्वप्नवत वाटू शकते. धाडसी पोलिस आॅफिसर आणि पुणे पोलिस दलातील विशेष शाखेच्या उपायुक्त ज्योतिप्रियासिंह यांच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेचा आणि मदतीचा अनुभव एका कुटुंबाला आला. त्यांनी सोशल मिडियात ज्योतिप्रियासिंह यांचे कौतुक केले.  

पुणे : पोलिस खात्याबद्दल अनेकदा टिकेचे सूर निघतात. मात्र एखादा कार्यक्षम अधिकारी सुखद अनुभव देऊ शकतो, हे स्वप्नवत वाटू शकते. धाडसी पोलिस आॅफिसर आणि पुणे पोलिस दलातील विशेष शाखेच्या उपायुक्त ज्योतिप्रियासिंह यांच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेचा आणि मदतीचा अनुभव एका कुटुंबाला आला. त्यांनी सोशल मिडियात ज्योतिप्रियासिंह यांचे कौतुक केले.  

पुण्यातील  एरंडवणे भागातील रमेश परांजपे यांना पोलिस खात्याचा भारावून टाकणार अनुभव आला. परांजपेंचे जावई जोशी व त्यांचे कुटुंब भारतात आले असता त्यांची बॅग चोरीस गेली. या बॅंगेत त्यात त्यांचे पासपोर्ट होते. त्यांनी "तात्काळ" मध्ये पासपोर्टसाठी अर्ज केला. अलंकार पोलीस स्टेशनचे पासपोर्ट विभागाचे दिगंबर भोगन यांनी त्यांना योग्य मार्गदर्शन केले. त्यातून श्री परांजपे यां यांचे जावई व कन्येस त्वरित पासपोर्ट जारी झाले.

यानंतर ही ते तणावात होते. कारण त्यांच्या नाती इशा आणि मीरा यांचे पासपोर्ट अमेरिकन होते. त्या ग्रीन कार्ड होल्डर आहेत. त्यामुळे त्यांचे अमेरिकन पासपोर्ट आल्यानंतर अवघ्या ३६ तासाने त्यांना उड्डाण करायचे होते.  त्यांची तिकिटे आरक्षित केलेली होती. त्यांनी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते संदीप खर्डेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ज्योतीप्रिया सिंग यांच्याशी संपर्क साधला.

 ज्योतिप्रियासिंह यांनी त्वरित जोशी कुटुंबियांना भेटीस बोलावले व पोलीस निरीक्षक अनुजा देशमाने यांना सूचना दिल्या. निर्गमनाची प्रक्रिया किचकट होती. अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या कुटुंबास इकडचे फारसे चांगले अनुभव नव्हते. तसेच दोन्ही मुलींना घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयात जाण्याबाबतही साशंक होते. मात्र ज्योतिप्रियासिंह यांच्या यांच्या सकारात्मक प्रतिसादाने हे कुटुंब भारावले. पोलिस निरीक्षक अनुजा देशमाने  यांनी दिवसभर थांबून अवघ्या २४ तासात त्यांच्या निर्गमनाची व्यवस्था केली.

पोलीस अधिकाऱ्यांचे आभार मनात असतानाच जोशी कुटुंब नियोजित वेळी अमेरिकेस परतले ते पोलिस खात्याच्या सुखद आठवणी घेऊनच! ज्योतिप्रियासिंह या नगर, कोल्हापूर आणि जालना येथील गुंडांसाठी कर्दनकाळ ठरल्या होत्या. त्यांचे पोलिस अधिकारी म्हणून तीनही जिल्ह्यातील कारकिर्द गाजली होती. पुण्यात त्यांनी विशेष शाखेतही आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. 

.

टॅग्स

संबंधित लेख