Interim Stay in Atrocity Case gives Relief to Narayan Rane | Sarkarnama

17 वर्षांपूर्वीच्या 'अॅट्राॅसिटी' खटल्यात नारायण राणेंना तात्पुरता दिलासा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

वळवी यांच्या तक्रारीनुसार काही कामानिमित्ताने 2002 मध्ये ते मुंबईत आले होते. त्या वेळी राणे यांनी त्यांना मातोश्री स्पोर्ट क्‍लब येथे भेटीसाठी बोलावून तत्कालीन कॉंग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेण्यासाठी दबाव टाकला. वळवी यांनी त्यास विरोध करत तेथून निसटण्याचा प्रयत्न केला; मात्र तेथील अंगरक्षकांनी वळवी यांना अडवून डांबून ठेवले.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार पद्माकर वळवी यांना 17 वर्षांपूर्वी डांबून ठेवल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याविरोधात कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या अॅट्रॉसिटी खटल्याला उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.

तत्कालीन शिवसेना नेते आणि विद्यमान राज्यसभा सदस्य असलेल्या राणे यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयातील याचिकेवरील निर्णय येईपर्यंत राणे यांच्याविरोधातील कनिष्ठ न्यायालयातील खटल्याची सुनावणी स्थगित ठेवावी, असे आदेश न्या. ए. ए. सय्यद आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने आज दिले.

वळवी यांच्या तक्रारीनुसार काही कामानिमित्ताने 2002 मध्ये ते मुंबईत आले होते. त्या वेळी राणे यांनी त्यांना मातोश्री स्पोर्ट क्‍लब येथे भेटीसाठी बोलावून तत्कालीन कॉंग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेण्यासाठी दबाव टाकला. वळवी यांनी त्यास विरोध करत तेथून निसटण्याचा प्रयत्न केला; मात्र तेथील अंगरक्षकांनी वळवी यांना अडवून डांबून ठेवले.

दुसऱ्या दिवशी वळवी त्या ठिकाणाहून रिक्षाने निसटले; परंतु हिरानंदानी गार्डनजवळ राणेंच्या माणसांनी त्यांना पुन्हा गाठले आणि परत क्‍लबला आणले. वळवी यांनी पुन्हा सुटका करून घेत 27 जुलै 2002 रोजी कफ परेड पोलिस ठाण्यात राणे यांच्याविरोधात ऍट्रॉसिटीची तक्रार दाखल केली. दंडाधिकारी आणि सत्र न्यायालयात हा खटला सुरू आहे.

संबंधित लेख