interest in national politics chandrababu naidu | Sarkarnama

मी सत्तेचा लोभी नाही : चंद्राबाबू नायडू 

वृत्तसंस्था
रविवार, 2 डिसेंबर 2018

हैदराबाद : राष्ट्रीय राजकारणात जाऊ शकतो, मात्र तेलंगणच्या राजकारणात जाणार नाही. मी सत्तेचा लोभी नाही, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी स्पष्ट केले आहे.

 तेलंगण विधानसभा निवडणुकीसाठी चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीने कॉंग्रेसशी आघाडी केली आहे. त्यास पीपल्स आघाडी असे नाव दिले आहे. या आघाडीत अन्य पक्ष देखील आहेत. 2019 मध्ये विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व कोण करणार असे विचारले असता, ते म्हणाले की अनेक सक्षम नेते आणि प्रशासक आहेत. ते नेतृत्व करतील. यावर आम्ही एकमत तयार करू. पंतप्रधान पदाच्या शर्यतीतही नसल्याचे नायडू म्हणाले. 

संबंधित लेख