Inspiting Journey of Pune's Chaitali Gapat | Sarkarnama

पुण्याच्या चैताली गपाटने 7 वर्षात मिळवल्या तीन पदव्या, बनली उपनिरीक्षक अन्‌ पटकावली 'स्वोर्ड ऑफ ऑनर'! 

संपत देवगिरे
मंगळवार, 8 जानेवारी 2019

तशी ती सामान्य कुटुंबातली. बारावी उत्तीर्ण झाल्यावर पुण्यात पोलिस दलात महिला शिपाई झाली. मात्र, तेवढ्यावर समाधानी न राहता गेल्या सात वर्षात तीने कला, विज्ञान आणि कायदा शाखेच्या पदव्या प्राप्त केल्या. स्पर्धा परिक्षेतून आता ती उपनिरीक्षक झाली आहे. 116 व्या तुकडीच्या खडतर प्रशिक्षणात मानाची तलवार मिळवणारी सर्वोत्तम कॅडेट ती ठरली आहे. मात्र, एवढ्यावर थांबायला ती तयार नाही. ती म्हणते, "आता मी एलएलएम करणार. आयपीएस होणार.''

नाशिक : तशी ती सामान्य कुटुंबातली. बारावी उत्तीर्ण झाल्यावर पुण्यात पोलिस दलात महिला शिपाई झाली. मात्र, तेवढ्यावर समाधानी न राहता गेल्या सात वर्षात तीने कला, विज्ञान आणि कायदा शाखेच्या पदव्या प्राप्त केल्या. स्पर्धा परिक्षेतून आता ती उपनिरीक्षक झाली आहे. 116 व्या तुकडीच्या खडतर प्रशिक्षणात मानाची तलवार मिळवणारी सर्वोत्तम कॅडेट ती ठरली आहे. मात्र, एवढ्यावर थांबायला ती तयार नाही. ती म्हणते, "आता मी एलएलएम करणार. आयपीएस होणार.''

काहीसा अवघड, अशक्‍य वाटणारा प्रवास लिलया यशस्वीपणे पुर्ण करणारी ही रणरागिणी आहे पुण्याची पूर्वीची पोलिस शिपाई चैताली गपाट. महाराष्ट्र पोलिस उपनिरिक्षकांच्या 116 व्या तुकडीचे दीक्षांत संचलन आज पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या उपस्थितीत झाले. या तुकडीतल्या 154 प्रशिक्षणार्थींनी उपनिरीक्षकपदी रुजू होणार म्हणून आनंदोत्सव केला. एरव्ही संसाराचा गाडा ओढणाऱ्या एका वीरश्रीने त्या सर्वात अव्वल ठरत मानाची तलवार पटकावली. 

झाशीच्या राणीने कमरेला अपत्य बांधावं आणि समशेर घेत रणात उतरावे अशा सहज आवेशात ही चैताली आपला जीवनप्रवास उलगडत होती. ती म्हणाली, "आम्ही महिला कमी नाहीत. हे मला दाखवून द्यायचे होते. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रातही सर्वोत्तम कामगिरी करुन ते साध्य केले याचा आनंद वाटतो.'' यात माझ्या पतीने मला खुप प्रोत्साहन दिल्याचे नमुद करीत आता मी ''एलएलएम' होऊन स्पर्धा परिक्षा देऊन भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) दाखल होण्याचे ठरवले आहे.'' असं तिनं सांगितलं.

चैताली गपाटचे वेगळेपण म्हणजे ती अत्यंत सामान्य कुटुंबातुन आली आहे. इंदापूर ( जिल्हा उस्मानाबाद) हे तिचे मूळ गाव. बारावी उत्तीर्ण झाल्यावर ती 2010 मध्ये पुण्यात पोलिस शिपाई म्हणुन रुजू झाली. विवाह झाला. पती खासगी संस्थेत नोकरी करतात. त्यानंतर तिने विज्ञान शाखेची पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पोलिस प्रशासन विषयात बीए पदवी मिळवली. कायदा शाखेची पदवी मिळवली. घरात चार वर्षाचे अपत्य असतांना तिने 2016 मध्ये विभागांतर्गत परिक्षेद्वारे ती उपनिरीक्षक बनली.  गेले वर्षेभर तिने या खडतर प्रशिक्षणात अव्वल येत 'स्वोर्ड ऑफ ऑनर' मिळवली. यामध्ये विविध सात प्रकारच्या प्रशिक्षणात सर्वोत्तम पदके प्राप्त करीत सर्वोत्तम प्रशिक्षणार्थी ठरली आहे.

संबंधित लेख