Information bureau on social media | Sarkarnama

शेतकऱ्यांचा आक्रोश रोखण्यासाठी माहिती विभाग सोशल मिडीयावर

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 जून 2017

'सारे काही शेतकऱ्यांसाठी' अशा मथळ्याखाली शासनातर्फे राबविण्यात आलेल्या विविध योजनाची माहिती देण्यात येत आहे. यात प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या-त्या जिल्ह्यातील 'व्हाॅटसअॅप' ग्रृपवर ही माहिती दिली जात आहे. मात्र, यात शासनाच्या कोणत्या विभागातर्फे ही माहिती देण्यात येत आहे. याचा कोणताही उल्लेख नाही.

जळगाव - कर्जमुक्ती, शेतमाला रास्त भाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात या मागण्यासाठी राज्यात शेतकऱ्यांनी काल (ता.1) पासून संप सुरू केला आहे. शेतकरी रस्त्यावर येवून शासनाचा निषेध करीत आहे.त्यांचा हा आक्रोश रोखण्यासाठी शासनाने माहिती व जनसंपर्क विभागाला कामाला लावले आहे, या विभागातर्पे आता सोशलय मिडीयावर दोन वर्षात सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेली माहिती ठळक स्वरूपात देण्यात येत आहे.

'सारे काही शेतकऱ्यांसाठी' अशा मथळ्याखाली शासनातर्फे राबविण्यात आलेल्या विविध योजनाची माहिती देण्यात येत आहे. यात प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या-त्या जिल्ह्यातील 'व्हाॅटसअॅप' ग्रृपवर ही माहिती दिली जात आहे. मात्र, यात शासनाच्या कोणत्या विभागातर्फे ही माहिती देण्यात येत आहे. याचा कोणताही उल्लेख नाही. शेतकऱ्यांचा आक्रोश कमी करण्यासाठी शासन आता सर्व स्तरावरप्रयत्न करीत असून त्यात राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागासह जिल्हा माहिती कार्यालयासही कामास लावण्यात आल्याचे दिसून येत आहे.

संबंधित लेख