indu sarkar in akola | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

अकोल्यात "इंदू सरकार' बंद चा कॉंग्रेसचा प्रयत्न

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 जुलै 2017

अकोला : प्रदर्शनापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या "इंदू सरकार' चित्रपटाच्या प्रदर्शनाला कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध करीत राधाकृष्णा टॉकीजसमोर निदर्शने करीत शो बंद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलनकर्त्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले. 

मधुर भांडारकर दिग्दर्शित इंदू सरकार या चित्रपटाला सध्या देशभर कॉंग्रेसकडून विरोध केला जात आहे. आणीबाणीच्या कालखंडावर आधारित असणाऱ्या या चित्रपटाच्या माध्यमातून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे चारित्र्यहनन करण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेसकडून या चित्रपटावर करण्यात येत आहे. अकोल्यात शुक्रवार (ता.28) या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी कॉंग्रेसचे प्रदेश महासचिव मदन भरगड, महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, महानगर कोषाध्यक्ष गणेश कटारे, महिला कॉंग्रेसच्या महानगराध्यक्ष सुषमा निचळ, शहर महासचिव राजेश पाटील, नगरसेवक मोहम्मद नौशाद, अनंत बगाडे, तश्वर पटेल, निखिलेश दिवेकर, कपील रावदेव, मेहमुद पठाण, जमीरभाई, मोंटूभाई, हरिष कटारिया, डॉ.वर्षा बडगुजर, पुष्पा देशमुख आदी पदाधिकाऱ्यांनी राधाकृष्णा टॉकीजसमोर जोरदार निदर्शने केली. 

पदाधिकाऱ्यांनी इंदू सरकार चित्रपटाचा शो बंद पाडण्याची मागणी रेटून धरत चित्रपटाचे पोस्टर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. 

संबंधित लेख