indira nuyi retire decision no politics | Sarkarnama

पेप्सिकोच्या इंद्रा नूयी म्हणतात, "" राजकारण; नको रे बाबा !'' 

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

वॉशिंग्टन ः राजकारण ! नको रे बाबा ! असे सांगत मी सर्व लक्ष कुटुंबावर केंद्रीत करणार आहे असे 'पेप्सिको'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी यांनी म्हटले आहे. 

वॉशिंग्टन ः राजकारण ! नको रे बाबा ! असे सांगत मी सर्व लक्ष कुटुंबावर केंद्रीत करणार आहे असे 'पेप्सिको'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी यांनी म्हटले आहे. 

काही वर्षे पेप्सिकोत मोठ्या पदावर काम केल्यानंतर त्यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला. फॉर्च्युनला दिलेल्ला मुलाखतीत नूयी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ''यापुढे काय करायचे, हे मलाही माहीती नाही. मात्र, एक गोष्ट नक्की आहे की, मी कोणतेही कार्यालयीन काम करणार नाही. पेप्सिकोसारख्या कंपनीचे सीईओ असल्यावर एकाच गोष्टीला प्राधान्य असते, ते म्हणजे सीईओ असणे. गेल्या 24 वर्षात मी माझ्या कुटुंबापेक्षा कंपनीला प्रथम प्राधान्य दिले. मात्र, आता आपले सर्व लक्ष कुटुंबावर केंद्रीत करणार आहे. माझ्या कुटुंबियांत थोडासा बदल झाला असल्याचे मला वाटते.'' 

मी एक उत्तम कर्मचारी असून, मला राजकारणाची किंवा राजकीय होण्याची भिती वाटत नाही. पण, मी त्यात म्हणावे इतकी कुशल नाही. असे स्पष्ट करत त्यांनी राजकीय प्रवेशाच्या चर्चेला विराम दिला. 

संबंधित लेख