India ranks 122 in Happy Countries list | Sarkarnama

आनंदी देशांच्या यादीत भारत 122 व्या क्रमांकावर

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मार्च 2017

संयुक्त राष्ट्रसंघाच्या "वर्ल्ड हॅपिनेस्ट रिपोर्ट 2017" मध्ये आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक अहवालात 122 वा आहे. यात अहवालात भारताचा क्रमांक 122 वा असून गेल्या वर्षापेक्षा त्यात चार क्रमांकाने घसरण झाली आहे. यंदा चीन, पाकिस्तान, नेपाळ, इराक हे देश भारताच्या पुढे गेले आहेत

नवी दिल्ली - भारतात आनंद साजरा करण्यास निमित्त लागते. सण-उत्सवांची रेलचेल तर असतेत. शिवाय कौटुंबिक, सामाजिक स्तरावरील चांगल्या घटनामुळे भारतीय लोक आनंदित होता. मात्र भारत पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षा दुःखी देश आहे, असा निष्कर्ष संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) "वर्ल्ड हॅपिनेस्ट रिपोर्ट 2017'मध्ये (जागतिक आनंदी अहवाल) काढलेला आहे. आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक अहवालात 122 वा आहे.

जगातील सर्वांत आनंदी देश म्हणून डेन्मार्कने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. गेल्या वेळी नॉर्वे या स्थानावर होता. "यूएन'च्या अहवालात एकूण 155 देशांचा समावेश केला आहे. आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस सोमवारी (ता.20) साजरा करण्यात आला. त्या वेळी या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. यात भारताचा क्रमांक 122 वा असून गेल्या वर्षापेक्षा त्यात चार क्रमांकाने घसरण झाली आहे.

त्यामुळे यंदा चीन, पाकिस्तान, नेपाळ, इराक हे देश भारताच्या पुढे गेले आहेत. हे क्रमांक ठरविताना संबंधित देशांमधील नागरिकांचे उत्पन्न, जीवनशैली, सामाजिक स्थिती, व्यक्तिगत स्वातंत्र्य, भ्रष्टाचार व निस्वार्थीपणा या घटकांची पाहणी करण्यात आली होती. असमतोल, विश्‍वासाचे नाते म्हणजेच सरकारी व उद्योग पातळीवर भ्रष्टाचार मुक्त कारभार, एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या तुलनेत दरडोई उत्पन्न हेही लक्षात घेण्यात आले. तसेच आनंदाचे मूल्यमापन एक ते दहा क्रमांकात करण्यात आले आहे.

 

संबंधित लेख