कर्नाटकात अपक्ष आमदाराची पुन्हा कोलांटउडी 

कर्नाटकात अपक्ष आमदाराची पुन्हा कोलांटउडी 

बंगलुरू : राजकारणात एकूनच धक्का देणाऱ्या घटना घडत असून काल भाजपला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांने आज कॉंग्रेस-जेडीएला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, माजी पंतप्रधान देवगौडा यांच्या वाढदिवशी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल त्यांच्यासाठी गिफ्ट असल्याचे मानले जात आहे. 

कर्नाटक निधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप मॅजिक फिगरपर्यंत पोचला नाही. त्यांना बहुमतासाठी आणखी आठ आमदार कमी पडल्याने भाजपने आकड्याची जुळवाजुळव करण्यास सुरवात केली. कॉंग्रेसचे चार आणि जेडीयूचे तीन आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दाव करण्याबरोबर अपक्ष आमदार आर.शंकरन यांचा पाठिंबा असल्याचे पत्र राज्यपालांना दिले होते. 

शंकरन यांचे पत्रही येडियुरप्पांनी दिले होते. मात्र काल कॉंग्रेसच्या आमदारांनी धरणे धरल्यानंतर या आंदोलन हे अपक्ष आमदार सहभागी झाले होते. काल भाजपत असलेल्या या आमदाराने लगेच कोलांटउडी मारल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

जेडीयू आणि कॉंग्रेसने आपणास सोळा आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करतानाच अपक्ष आमदारही आमच्यासोबत असल्याचे म्हटले आहे. दुसरे एक अपक्ष आमदार नागेश हे मात्र प्रथमपासूनच कॉंग्रेससोबत राहिले आहे.
 
शंकर हे कर्नाटक प्रजा जनता पक्षाचे एकमेव आमदार आहेत. ते राणीबेण्णूरमधून निवडून आले असून त्यांनी कॉंग्रेसचे हेवीवेट नेते आणि विधानसभा अध्यक्ष के.बी.कोलिवाड यांना पराजित केले आहे. गेल्या मंगळवारी रात्री त्यांनी येडियुरप्पा यांची भेट घेऊन पाठिंबा दिला होता. तर काला गुरूवारी ते पुन्हा कॉंग्रेसच्या गटात सहभागी झाले. इतकेच नव्हे तर त्यांनी आमदारांच्या धरणेआंदोलनातही सहभाग घेतला.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com