'आम्ही धड बाई ना धड गडी' ! - अपक्ष आमदारांची व्यथा

राजकीय महत्व सोडा परंतु विधानसभा कामकाजातही आमदारांना संधी मिळत नाही. "आम्ही धड बाई ना धड गडी ! " सांगत अहमदपूरचे आमदार विनायक पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत अपक्ष आमदारांची व्यथा मांडली .
vidhimandal
vidhimandal

मुंबई  : कधीकाळी अपक्ष आमदारांच्या तालावर सरकार चालवाचे. बहुमतात असलेल्या  भाजप- शिवसेनेच्या युती सरकारमध्ये मात्र अपक्ष आमदारांची अवस्था बिकट झाली आहे. राजकीय महत्व सोडा परंतु विधानसभा कामकाजातही आमदारांना संधी मिळत नाही. "आम्ही धड बाई ना धड गडी ! "  सांगत अहमदपूरचे आमदार विनायक पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत अपक्ष आमदारांची व्यथा मांडली .  

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर अर्थसंकल्पातील विभागवार अनुदान योजना प्रस्तावावरील चर्चेला सुरुवात करताना तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सभागृह सदस्यांना वेळेचे वाटप केले.

यावर आक्षेप घेत अपक्ष आमदार विनायक पाटील म्हणाले, " विधानसभेत सर्व अर्थसंकल्प असेल, अर्थसंकल्पित पुरवणी मागण्या असतील आणि इतर विषय असतील. त्यावर बोलायला सभापती महोदय तुम्ही सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांना वेळ वाटून देता.  आम्ही अपक्ष आमदार असून सरकारला आम्ही पाठिंबा दिला आहे. आम्हाला मात्र वेळ देत नाहीत.  आम्हा अपक्ष आमदारांची अवस्था ना धड बाई ,ना धड गडी  अशी झाली आहे" .

सत्ताधारी आणि विरोधक वाटून चर्चेची संधी  घेतात. अपक्षांना वाली कोण ? असा सवाल विचारत विनायक पाटील म्हणाले, " आम्हा अपक्ष आमदारांची अवस्था ' घर का ना घाटका' अशी झाली आहे. आम्हाल संधी नाही. आम्हाला कोणी विचारत नाही. आम्ही बाई की गडी आहोत ? हे ही  समजत  नाही, असे हतबलपणे पाटील यांनी सांगितले.

त्यावर तालिका अध्यक्ष योगेश सागर म्हणाले, " तुम्हीही प्रस्तावावरील चर्चेत भाग घेण्यासाठी नाव द्या. तुम्हालाही संधी मिळेल "

 अपक्ष आमदार विनायकराव पाटील यांनी  खंत व्यक्त करताना दिलेल्या उदाहरणामुळे  विधानसभेत हशा पिकला .
. तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी सर्व सदस्यांना समान अधिकार असल्याचे सांगत अपक्षांनाही चर्चेसाठी संधी देऊ असे सांगत चर्चा थांबवली.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com