INDAPUR POLITICS : RACE BETWEEN HARSHWARDHAN AND BHARANE | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

इंदापुरात बाबीर देव कोणाला पावणार? 

राजकुमार थोरात
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

इंदापूर तालुक्यातील स्पर्धा आता कमालीची तीव्र झाली आहे. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी २०१४ च्या पराभवाची परतफेड करण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यांनी तालुक्यातील आपला संपर्क कमालीचा वाढवला आहे. दुसरीकडे विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे यांनीही आपली कार्यक्षमता पणाला लावली आहे.

वालचंदनगर : इंदापूर तालुक्‍यामध्ये आमदार दत्तात्रेय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये चढोओढीचा वेग कमालीचा वाढला आहे. तालुक्‍यातील ग्रामपंचायतीच्या निकालानंतर दोघांनी ही प्रत्येकी 17 ग्रामपंचायतीवर दावे करून नवनिर्वार्चित सरपंच व सदस्यांच्या सत्काराचे आयोजन केले होत. रुई येथे बाबीर देवाच्या यात्रेमध्ये दोघांनीही उपस्थिती लावून देवाचे दर्शन घेतले. 2019 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये बाबीर दोघांपैकी नक्की कोणाला पावणार याची चर्चा तालुक्‍यासह जिल्हामध्ये जोरदार सुरू आहे. 

2014 च्या विधानसभा निवडणुकीचा पराभव हर्षवर्धन पाटील यांच्या मनाला चटका लावणारा ठरला. पराभवानंतर पाटील यांनी एक वर्षानंतर तालुक्‍यामध्ये जोमाने पक्षबांधणीला सुरवात केली. सर्वसामान्य जनतेशी तुटलेली संपर्काची नाळ नव्याने जोडण्यास सुरवात केली. विविध कार्यक्रमाचे निमित्ताने गावोगावी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्याचे प्रमाण वाढले.

आमदार भरणे यांनी तर सर्वसामान्य नागरिकांनी कामासाठी पुढाऱ्यांना न सांगता थेट फोन करण्याचे आवाहन करून दांडगा संपर्क ठेवला आहे. सर्वसामन्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी रविवार हा दिवस जनता दरबारासाठी राखीव ठेवला. केंद्रामध्ये व राज्यामध्ये भाजपचे सरकार असल्याने लोकसभा व विधानसभा निवडणुका या एकत्र होण्याची शक्‍यता असल्याने आमदार भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील या दोघांनी तालुक्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे.

राज्यामध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये युती करण्याची चाचपणी केली होती. दोन्ही पक्षामध्ये युती झाली तरीही तालुक्‍यामध्ये भरणे व पाटील यांच्यामध्ये युती होणे अशक्‍य आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालानंतर दोघांमध्ये कमालाची चढाओढ पहावयास मिळाली. यात्रा, जत्रा, आंदोलने व विविध कार्यक्रमाला दोघेही हजेरी लावत आहे. 

संबंधित लेख