indapur grampanchaya election results | Sarkarnama

इंदापूरात ग्रामपंचायत निकालावरून भरणे आणि पाटील समर्थकांचे दावे-प्रतिदावे

राजकुमार थोरात
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने १४ पैकी १० ग्रामपंचायतीवर व कॉग्रेसने ५ ग्रामपंचायतीवर वर्चस्वाचा दावा केला आहे. दोन्ही पक्ष ग्रामपंचायतीची संख्या गेल्या पंचवार्षिकपेक्षा वाढली असल्याचे सांगत आहेत.

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने १४ पैकी १० ग्रामपंचायतीवर व कॉग्रेसने ५ ग्रामपंचायतीवर वर्चस्वाचा दावा केला आहे. दोन्ही पक्ष ग्रामपंचायतीची संख्या गेल्या पंचवार्षिकपेक्षा वाढली असल्याचे सांगत आहेत.

विधानसभेच्या निवडणुकील एक वर्षाचा अवधी शिल्लक राहिल्याने तालुक्यामध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीला महत्व आले होते. १४ ग्रामपंचायतीपैकी तरटगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली. १३ ग्रामपंचायतीच्या निवडणूका चुरशी झाल्या. गावोगावी मतदानाची टक्केवारी ही वाढली होती. सरासरी ९० टक्कपर्यंत नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला.

निवडणुकीचे निकाल जाहिर होताच आज राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने १४ पैकी १० ग्रामपंचायतीवर वर्चस्व असल्याचा दावा केला.  तसेच  पवारवाडी व उध्दट या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये संमिश्र यश असल्याचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील व युवकचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या दाव्यानंतर कॉग्रेसने ही पाच ग्रामपंचायतीवर दावा केला अाहे. तरटगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली असुन या ग्रामपंचायतीवर सर्वपक्षीय सत्ता असल्याचा अाली आहे. गतवर्षीच्या पंचवार्षिक पेक्षा एका ग्रामपंचायत कॉग्रेसने जास्त मिळविली असल्याचे सांगून ग्रामपंचायत सदस्यांची संख्या  ३१ ने  वाढली असल्याचा दावा कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड.कृष्णाजी यादव यांनी केला आहे. 

राष्ट्रवादी कॉग्रेसने दावा केलेल्या ग्रामपंचायतीची नावे

तरटगाव (बिनविरोध) , शेळगाव, आगोती - नं१, वडापुरी, बोरटवाडी, कालठण नं २, आगोती- नं २ , गोखळी, पंधारवाडी व खोरोची 
--

काॅग्रेसने दावा केलेल्या ग्रामपंचायती...
कांदलगाव, कालठण नं.1, खोरोची, उद्धट, पवारवाडी 

संबंधित लेख