indapur election preparation | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

इंदापुरातील इच्छुकांचे बाबीर यात्रेत ढोलवादन पण विधानसभेत विजयाचा ढोल कोणाचा वाजणार?

राजकुमार थोरात
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील बाबीर देवाची यात्रा नुकतीच पार पडली. यात्रेला तालुक्यातीलविधानसभेच्या इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावून बाबीर देवाचे दर्शन घेतले.२०१९ च्या विधानसभेच्या निवडणूकीचे बिगुल वाजण्यास सुरवात झाली असून इच्छुकांपैकी बाबीर कोणाला पावणार याकडे तालुक्यासह जिल्हाचे लक्ष लागले आहे.

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील बाबीर देवाची यात्रा नुकतीच पार पडली. यात्रेला तालुक्यातीलविधानसभेच्या इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावून बाबीर देवाचे दर्शन घेतले.२०१९ च्या विधानसभेच्या निवडणूकीचे बिगुल वाजण्यास सुरवात झाली असून इच्छुकांपैकी बाबीर कोणाला पावणार याकडे तालुक्यासह जिल्हाचे लक्ष लागले आहे.

विधानसभेची निवडणूक जवळ येऊ लागली आहे तसे तालुक्यातील राजकीय वातावरण तापत चालले आहे. विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक असलेले आमदार दत्तात्रेय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे व जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी तालुक्यातील प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा धडाकाचा सुरु  केला आहे.

ही मंडळी जनतेच्या सुख:दुखामध्ये न विसरता सहभागी होवू लागले आहेत. तालुक्यातील यात्रा-जत्रांना न चुकता हजेरी लावण्याचा सपाटाच चौघांनी सुरु केला आहे. तालुक्यातील रुई गावातील बाबीर देवाची यात्रा नुकतीच पार पडली. यामध्ये सुरवातीलाच जगदाळे व माने यांनी मंदिराच्या परीसरामध्ये ढोल वाजवून आम्ही दोघेही विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगून आमदार भरणे यांच्या पुढे पेच आणखी वाढवला आहे.

जगदाळे, माने यांच्याबरोबर आमदार भरणे व माजी मंत्री पाटील यांनीही बाबीरचे दर्शन घेवून बाबीरला साकडे घातले. दोघांनीही बेरजेचे राजकारण सुरु केले असून पूर्वी विरोधक असलेल्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांचा विरोध कमी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.  राष्ट्रवादीतुन भरणे, जगदाळे व माने हे तीव्र इच्छुक आहेत. तर काॅंग्रेसकडून हर्षवर्धन पाटील एकमेव इच्छुक आहे. राज्यामध्ये राष्ट्रवादी व कॉग्रेस पक्षाची आघाडी हाेण्याची शक्यता आहे. मात्र तालुक्यामध्ये दोन्ही पक्षांची बिघाडी होणार असून ज्या पक्षाला जागा मिळणार नाही त्या पक्षातील इच्छुक उमेदवार बंडखोरीच्या किंवा अन्य पक्षातून निवडणूक लढविण्याच्या तयारीमध्ये आहेत.

संबंधित लेख