कुल यांचे पोलिस संरक्षण वाढविण्याची मागणी; राहू परिसरात बंद

कुल यांचे पोलिस संरक्षण वाढविण्याची मागणी; राहू परिसरात बंद

राहू : आमदार राहुल कुल यांच्यावर भ्याड हल्याच्या कट रचणा-या घटनेच्या निषेधार्थ राहू (ता. दौंड) बेटपरिसरातील अनेक गावांनी व्यवहार बंद पाळून निषेध सभा घेतल्या.

कुल यांना खुनाची धमकी देण्याचा प्रकार उघडकीस आल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे. राहूच्या मुख्य चौकात ग्रामस्थांनी बंद पाळत निषेध सभा घेतली. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी सोनवणे, बंडू नवले, सरपंच सुरेखा शिंदे, उपसरपंच अश्विन शिंदे, चिमाजी कुल, गणेश चव्हाण, अरूण नवले, नितीन कुंभार, राहुल सोनवणे, संदीप नवले, नितीन कुंभार, किसन शिंदे यांची भाषणे झाली.

देलवडी, पिलाणवाडी, डुबेवाडी, पाटेठाण पिंपळगाव, टाकळी भीमा, दहिटणे, मिरवडी, देवकरवाडी, वडगाव बांडे, कोरगाव भिवर, वाळकी तसेच खामगाव परिसरातील अनेक गावात बंद पाळून निषेध सभा घेण्यात आल्या. अनेक गावांमधील चौकाचौकात टायर पेटून निषेध व्यक्त करण्यात आला. थोरली विहिर येथे एसटी बस रोखून निषेध करण्यात आला.

आमदार राहुल कुल यांना संपवणार आहोत, आमदाराची गाडी ब्लास्टिंगच्या साह्याने उडवणार असल्याचा संदेश पोलीस अधीक्षकांना पाठवण्याचा प्रकार उघडकीस आला. वरिष्ठ पातळीवरून चक्रे फिरल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सबंधितांना अटक केले आहे. या प्रकार कसा झाला. कोणी करायला लावला, यामागचे नेमके धागेदोरे, या घटनेमागचे मुख्य सूत्रधार नेमके कोणकोण आहेत यांचा तातडीने उलगडा होऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी  कुल समर्थकांकडून होत आहे.

शिवाजी सोनवणे, विकास शेलार म्हणाले की कुल यांच्या जिवीताची मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेऊन त्यांना पोलीस संरक्षण मिळावे. अशी मागणी करण्यात आली. दरम्यान काही तासांच्या अवधीनंतर कुल यांच्या सूचनेनुसार राहू आणि बेटपरिसरातील नागरिकांनी गावातील व्यवहार पूर्ववत सुरू ठेवले.

या प्रकारावर कुल यांनी जाहीर निवेदन प्रसिद्धिस दिले आहे. ``माझ्याविरुद्ध काही संशयितांनी घातपाताचा कट रचलेल्या आशयाचा बातम्या प्रसारित झाल्या. मला कुठल्याही स्वरूपाची इजा झालेली नाही व मी सुखरूप आहे. सदर प्रकरणातील संशयितांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास चालू आहे. या प्रकरणातील सत्यता लवकरच बाहेर येईल. तेव्हा आपणा सर्वांस नम्र विनंती कि कुठल्याही अफवेला थारा देऊ नका व संयम बाळगा. आपल्या सर्वांचा आशीर्वाद व शुभेच्छां बद्दल आपला शतशः ऋणी आहे,`` अले त्यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com