incoming in MNS starts | Sarkarnama

मनसेमध्ये पुन्हा "इनकमिंग : कार्यकर्त्यांची पावले "कृष्णकुंज'वर

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत इनकमिंगला सुरवात झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपसह युवा सेनेतील काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुरुवारी मनसेमध्ये प्रवेश केला. पश्चिम उपनगर, बोरीवली, अंधेरी, वर्सोवा, वरळी या भागांतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी "कृष्णकुंज'वर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. 

2009 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर मनसेची गेल्यी काही निवडणुकांमध्ये घसरण झाली. पाच वर्षांच्या कालखंडात राज ठाकरे यांना निवडून आलेल्या जागाही राखता आल्या नाहीत. परिणामी, प्रवीण दरेकर, राम कदम, शिशिर शिंदे या माजी आमदारांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेना आणि अन्य पक्षांत प्रवेश केला.

लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यासाठी राज ठाकरे राज्याचा दौरा करत आहेत. यासाठी ते पक्षबांधणी करत आहेत. तसेच सध्या कोणत्याही निवडणुका नसताना राज यांच्या सभेला मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे अनेक पक्षांतील कार्यकर्ते मनसेमध्ये प्रवेश करत असल्याचे सध्याचे चित्र आहे. राज ठाकरे हे आता विदर्भ दौऱ्यावर जाणार आहेत. तेथेही पक्षाची बांधणी करण्यासाठी ते पावले उचलणार आहेत.

संबंधित लेख