include marathas in obc : Mane | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

मराठ्यांना ओबीसीत घ्या पण; मूळच्या ओबीसींचे नुकसान नको : माने

अमोल कविटकर
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पुणे : कोणतीही चर्चा न करता मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर करणे हा लोकशाहीचा घात असून यात सत्ताधारी आणि विरोधक दोघेही सहभागी आहेत, असा आरोप करत मराठा समाज मागच्या दाराने सवलतींसाठी आत येत आहेत, अशी ओबीसींना भीती आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे निमंत्रक लक्ष्मण माने यांनी केला आहे.

मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करुन मूळचे ओबीसी आणि मराठा अशी `अ` आणि `ब` वर्गवारी करावी, असा पर्यायही माने यांनी सुचवला आहे.

मंजूर झालेले मराठा आरक्षण न्यायालयात टिकावे, यासाठी मुख्यमंत्र्यांना खोचक शुभेच्छा देत माने म्हणाले, 'इंटरनली ट्रान्सपरेबल' केल्यामुळे मुळच्या भटक्या- विमुक्तांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसे नुकसान मूळच्या ओबीसींचे होऊ नये. त्यामुळे ओबीसी मुळच्या १९ टक्के जागांना 'अ' म्हणावे आणि १६ टक्के मराठा समाजाच्या जागांना `ब' म्हणावे आणि अंतर्गत संवर्ग बदलता येणार नाही. यासाठी स्वतंत्र कायदा करावा, अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी असल्याचे माने यांनी सांगितले.

"मी मराठा समाजाच्या विरोधात आहे, असा माझ्यावर आरोप होतो. पण माझी बायको मराठा समाजाची आहे. माझे निम्मे नातेवाईक मराठा आहेत. मग मी या समाजाच्या विरोधात कसा असेन? गेल्या काही वर्षांपासून मी या समाजासोबत काम करतो आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी माझी मागणी आहे. मात्र आरक्षण देताना ते टिकेल का याचा विचार करायला हवा. मुख्यमंत्री दूरदृष्टीचे नाहीत त्यांचा कायदेशीर सल्लागार कोण?हे तपासले पाहिजे." असेही ते म्हणाले.

संबंधित लेख