imtiyaz jalil says, ab ki baar ambedkar sarkar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

अब की बार आंबेडकर सरकार : इम्तीयाज जलील

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

दलित, मुस्लीम आता सत्ता बनविणार आहेत.

पुणे: आगामी निवडणुकीत राज्यात वंचित आघाडीची सत्ता येणार आहे. त्यामुळे बहुजनांनी 'अब की बार आंबेडकर सरकार' हा निर्धार सर्वदूर पोचवावा, असे आवाहन एमआमएमचे आमदार इम्तीयाज जलील यांनी केले.

येथील एसएसपीएमएस मैदानावर आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या अधिवेशनात ते बोलत होते. प्रकाश आंबेडकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जलील म्हणाले, काँग्रेसचे लोक आमच्या विरोधात बोलत आहेत. कारण ते घाबरलेले आहेत. त्यांना 70 वर्षापासून मतदान करणारा वर्ग दूर गेला आहे. दलित, मुस्लीम आता सत्ता बनविणार आहेत. आता आम्ही बोलणार, त्यांना ऐकावे लागणार आहे. 'अब की बार आंबेडकर सरकार' ही आमची घोषणा आहे.

संबंधित लेख