खासदार इम्तियाज जलील यांनी घेतली मराठीतून शपथ 

एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी आज आपल्या खासदारपदाची शपथ मराठीतून घेत सर्वांनाच आर्श्‍चयाचा धक्का दिला. 'मी महाराष्ट्रीयन आहे, मराठी माझी मातृभाषा आहे आणि मला तिचा अभिमान आहे, म्हणून मी खासदारपदाची शपथ मराठी भाषेतून घेतली' असे इम्तियाज जलील यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना सांगितले.
खासदार इम्तियाज जलील यांनी घेतली मराठीतून शपथ 

औरंगाबादः एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी आज आपल्या खासदारपदाची शपथ मराठीतून घेत सर्वांनाच आर्श्‍चयाचा धक्का दिला. 'मी महाराष्ट्रीयन आहे, मराठी माझी मातृभाषा आहे आणि मला तिचा अभिमान आहे, म्हणून मी खासदारपदाची शपथ मराठी भाषेतून घेतली' असे इम्तियाज जलील यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना सांगितले. 

केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मला आजपासून संसदीय अधिवेशनाने सुरूवात झाली. नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी देखील यावेळी पार पडला. राजकारणात प्रादेशिक भाषा आणि अस्मितेचा मुद्दा नेहमीच चर्चेचा राहिला आहे. महाराष्ट्र विधानसभेत 2009 मध्ये मराठी भाषेतच शपथ घेण्याचा आग्रह करत तत्कालीन मनसे आमदार राम कदम यांनी समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांना धक्काबुक्की केली होती. आज याचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे कुठलीही मागणी किंवा बंधन नसतांना औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले खासदार इम्तियाज जलील यांनी संसदेत खासदारपदाची चक्क मराठी भाषेतून घेतलेली शपथ. एमआयएम पक्ष हा जहाल विचारांचा म्हणून ओळखला जातो. या पक्षाचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांची देशभरातील भाषणे नेहमीच वादाचा विषय ठरली आहेत. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी हे एकमेव खासदार सभागृहात होते. यावेळी त्यांच्या जोडीला औरंगाबादमधून इम्तियाज जलील हे आले आहेत. आज इम्तियजा जलील यांनी खासदार पदाची शपथ घेतांना मराठी भाषेला प्राधान्य देत मराठीतूनच शपथ घेतली. हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेवर प्रभुत्व असतांना त्यांनी शपथ घेण्यासाठी मराठी भाषाच का निवडली? या संदर्भात 'सरकारनामा' प्रतिनिधीने त्यांच्यांशी संपर्क साधला. 

इम्तियाज जलील म्हणाले, ''आपण भाषा आणि रंगांना देखील जातीय बंधनाच्या जोखडात बांधले आहे. मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो, तेव्हा तुम्ही आमदरकीची शपथ कोणत्या भाषेत घेणार यावरून मला अनेकांनी डिवचले होते. पण तेव्हाही मी मराठीतूनच शपथ घेतली होती. आज खासदार म्हणून शपथ घेतांना देखील माझ्या मनात इतर कुठल्या भाषेचा विचार नव्हता. कारण मी महाराष्ट्रीयन आहे, माझा जन्म या राज्यात झाला, मी लहानचा मोठा झालो, शिक्षणही इथेच घेतले. मुळात माझे महाराष्ट्र आणि इथल्या मातृभाषेवर प्रेम आहे आणि माझ्यासाठी परमोच्च असलेल्या अशा क्षणी मी माझ्या भाषेला कसा विसरेन. मला सगळ्या भाषा येत असल्या तरी मी खासदार पदाची शपथ मराठीत घेतली याचा मला मनस्वी आनंद आणि अभिमानही आहे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com