Imtiaz Jaleel criticized by BJUM | Sarkarnama

इम्तियाज जलील केवळ मुस्लिम समाजाचे आमदार आहेत का? भाजयुमोचा सवाल 

सरकारनामा
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

केवळ मुस्लिम भागात रस्ते, विकासकामे करण्यात आमदार महोदय व्यस्त असल्यामुळे इतर वसाहतींकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. अनेक भागात तर निवडून  आल्यापासून ते फिरकलेले नाहीत.

-अमित घनघाव

भाजयुमोचे शहर जिल्हा चिटणीस

औरंगाबादः " मध्य मतदारसंघातील एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील हे फक्‍त मुस्लिम समाजाचे नेतृत्व व काम करतात. मतदारसंघातील सर्व जाती-धर्मांच्या लोकांनी त्यांना निवडून  दिले आहे, पण त्यांना याचा विसर पडल्याचे दिसते,"  असा आरोप  भाजयुमोचे शहर जिल्हा चिटणीस अमित घनघाव यांनी केला आहे . 

 " केवळ मुस्लिम भागात रस्ते, विकासकामे करण्यात आमदार महोदय व्यस्त असल्यामुळे इतर वसाहतींकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. अनेक भागात तर निवडून  आल्यापासून ते फिरकलेले नाहीत. त्यामुळे ते मतदारसंघातील सर्व जाती-धर्माच्या लोकांचे प्रतिनिधित्व करतात की ते फक्त मुस्लिम समाजाचे आमदार आहेत? " असा सवाल भारतीय जनता युवा मोर्चाचे अमित घनघाव यांनी केला आहे . 

श्री . अमित घनघाव यांनी या संदर्भात आमदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयाला लेखी निवदेन पाठवून वरील आरोप केले आहेत. भीमनगर, नंदनवन कॉलनी, शांतीपुरा आदी भाग आपल्या मतदारसंघात येतो याचा विसर आपल्याला पडल आहे का? कारण निवडूण आल्यानंतर या भागात आपण एकदाही आला नाहीत, तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या नाही अशी टिका या निवदेनातून करण्यात आली आहे. 

गेल्या साडेतीन वर्षात आपल्या आमदार निधीचा एक छदमाही वरील भागात खर्च झालेला नाही. भीमनगर भागाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील खड्यांमुळे नागरीकांना पायी चालणे कठीण झाले आहे. विद्यार्थ्यांना खड्यांवरून उड्या मारत शाळा गाठावी लागते. पंरतु आपण कधीच या भागात न फिरकल्यामुळे येथील समस्या आपल्याला माहित नाहीत , असा टोला देखील घनघाव यांनी निवदेनातून लगावला आहे. 

आमच्या वार्डात या... 

तुमच्या मतदारसंघाचाच भाग असलेल्या आमच्या वार्डात एकदा या आणि इथल्या खड्डयांचा अनुभव घ्या असे आवाहन देखील या निवदेनातून करण्यात आले आहे. मुख्य रस्त्यावरील खड्यांमुळे तुमचे मतदार किती हालआपेष्टा सोसतात हे एकदा प्रत्यक्ष येऊन बघा. दोन-तीन दिवसांत तुम्ही याल आणि रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्याल अशी आशा बाळगतो. अन्यथा 14 सप्टेंबर पासून तुम्हाला निष्क्रीय ठरवून आपला निषेध म्हणून वसाहतीतील खड्यांमध्ये झाडे लावण्याची मोहिम हाती घेण्यात येईल असा इशारा देखील अमित घनघाव यांनी दिला आहे.

संबंधित लेख