imran khan win in pakistan | Sarkarnama

क्रिकेटपटू इम्रान खान पाकचे पंतप्रधान ? 

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 जुलै 2018

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचा आरोप होत असताना माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या बाजूने निकालाचा कौल दिसून येत आहे.

हा कल असाच राहिला तर पीटीआय पक्ष हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरू शकतो. आतापर्यंत आलेल्या निकालाचा कल पाहता 119 जागांवर पीटीआय पक्षाने आघाडी घेतली आहे. 

पंजाब प्रांताची राजधानी लाहोर येथे पीटीआय समर्थक जल्लोष करत असून, पक्षाचा ध्वज उंचावत घोषणाबाजी करत असल्याचे दिसून येत आहे. 65 वर्षीय इम्रान खानच्या पीटीआयने नॅशनल असेंब्लीच्या 272 पैकी 119 जागांवर आघाडी घेतली आहे. मुख्य प्रतिस्पर्धी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) यांनी 65 जागांवर आघाडी घेतल्याचे दिसून येते. 

पाकिस्तानचे माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी यांच्या बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पिपल्स पार्टी (पीपीपी) ने 44 जागांवर, तर अन्य पक्षांनी 17 जागांवर आघाडी घेतली आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीत एकूण 342 सदस्य असून, त्यातून 272 जागा थेटपणे निवडून आणल्या जातात. उर्वरित 60 जागा महिलांना आणि दहा जागा धार्मिक अल्पसंख्याकासाठी राखीव आहेत. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने पहाटे चारपासून अधिकृतरित्या निकालाचा कल सांगण्यास सुरवात केली. येत्या काही तासांत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. सध्याचा कल पाहता पीटीआय हा पक्ष नॅशनल असेम्ब्लीत सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरत आहेत. 272 पैकी 137 जागा जिंकणे गरजेचे आहे. 

नवाज शरीफ आणि बिलावल भुट्टो यांच्या पक्षांनी मतमोजणीच्या प्रक्रियेवर प्रश्‍न उपस्थित केले आहेत. आपल्या पक्षाच्या पोलिंग एंजटांना मतगणनेची माहिती दिली जात नसल्याचा आरोप केला आहे. 

दरम्यान, मतमोजणी प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झाला नसल्याचे पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने म्हटले आहे. आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे केल्याचे आयोगाने नमूद केले. पाकिस्तानचे मुख्य निवडणूक आयुक्त मोहंमद रझा खान यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्याचे मान्य करत नाराजी व्यक्त केली. 

दृष्टिक्षेपात निकाल 
एकूण जागा 272 
जिंकणे गरजेचे 137 
इम्रान खान यांच्या पक्षाला 119 
शरीफ यांच्या पक्षाला 65 
बिलावल भुत्तोंच्या पक्षाला 44 

संबंधित लेख