Images of C. M. and leader of opposition garlanded by fruits | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला नरमुंडाळी, तर विरोधपक्ष नेत्यांच्या फोटोला फळ भाज्यांचा हार

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 मे 2017


 मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेत्यांनी संगनमताने शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत शुक्रवारी
(ता. 19) औरंगाबाद बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी  आंदोलन केले.

औरंगाबाद:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतिमेला नरमुंडाळी व फळ भाज्यांचा हार घालत शेतकऱ्यांनी निषेध केला.

 मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेत्यांनी संगनमताने शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत शुक्रवारी
(ता. 19) औरंगाबाद बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले.

वर्षाभरापासून फळ भाजीपाल्याचे भाव पडले आहेत. शेतकऱ्यांचा माल कवडीमोल भावाने खरेदी होत असल्याने तो रस्त्यावर फेकून देण्याची त्याच्यावर वेळ आली. तोच प्रकार तुर खरेदीच्या बाबतीत शासनाकडून सुरु आहे. शेतकऱ्यांचे आतोनात हाल होत असतांना सरकारला जागे करण्यासाठी संपाचे हत्यार उपसले तर
त्यात मुख्यमंत्री विरोधीपक्ष नेत्याला हाताशी धरून त्यात फूट पाडण्याचाप्रयत्न करत आहेत. 

एकीकडे कर्जमुक्तीसाठी कॉंग्रेस संघर्ष यात्रा काढते तर दुसरीकडे याच मागणीसाठी संप करत असलेल्या शेतकऱ्यांचा संप मोडून
काढण्यासाठी विरोधीपक्ष नेते मुख्यमंत्र्यांना साथ देतात. मग कॉंग्रेस पक्षाचा संघर्ष मोर्चा हा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी नसून, फक्त राजकारण करण्यासाठी आहे काय, असा सवाल देखील शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला. 

युती सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली असून नाशिक जिल्ह्यात दहा दिवसांत 30 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा अन्नदाता संघटनेचे अध्यभ जयाजीराव सूर्यवंशी, विजय काकडे यांनी केला.

याचा निषेध म्हणून संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला
नरमुंडाळी तर विरोधीपक्ष नेत्यांच्या फोटोला फळ आणि भाज्याचा हार घालण्यात आला.

संबंधित लेख