illegal liquor sell in ratnagiri | Sarkarnama

ढाब्यावरील दारूविक्रीवरून खासदार राऊत व निलेश राणेंत जुंपली

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर निवळीत उपजिल्हाप्रमुखाच्या धाब्यावर रात्री उशिरा होत असलेल्या अनधिकृत दारु विक्रीचा पर्दाफाश केल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांची पळापळ सुरु झाली आहे. खासदारांपासून आमदार, जिल्हाप्रमुख सगळे गोळा झाले असून गेले दोन दिवस अख्खी शिवसेना कामाला लागली आहे. ही स्वाभिमानची ताकद आहे, असे माजी खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नीलेश राणे यांनी ठणकावले.

एका खासगी कार्यक्रमात स्वाभिमानच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्यानंतर स्वाभिमानचे सरचिटणीस नीलेश राणे रत्नागिरीत आले. त्यांनी जिल्हा सरकारी रुग्णालयात जखमी कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर काल (ता. 22) रात्री अचानक नीलेश यांनी निवळी येथील न्यू शांती धाब्यावर स्टींग ऑपरेशन केले. त्याची माहिती नीलेश यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले, "काही दिवसांपासून न्यू शांती धाब्यावर अवेळी दारू विकली जात असल्याची तक्रार होती. कारवाई केल्यानंतर आमदार सामंतांच्या फोनवर त्यांना सोडले जात होते. धाब्यावर पहाटे पाच वाजेपर्यंत दारू विकली जाते. याबाबत ग्रामीण पोलिस उपनिरीक्षक शहांकडे लेखी तक्रार केली आहे. त्यावर कारवाई होणे गरजेचे आहे, अन्यथा स्वाभिमान स्टाईलने कारवाई करु. तो धाबा शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप यांचा आहे. त्यांना पाठीशी घालण्यासाठी खासदारांनी पत्रकार परिषद घेतली. कदाचित त्या धाब्यावर खाल्लेल्या मिठाची परतफेड त्यांनी केली. अनधिकृत दारू विक्रेत्यांची बाजू मांडण्यासाठी बाकीचे सगळे सामाजिक प्रश्न बाजूला ठेऊन ते आले. खासदारानी अशांची बाजू घेणे शोभत नाही.' 

तर मुख्यमंत्र्यांकडे जाऊ
मारहाण केल्याची तक्रार घेण्यास पोलिस निरीक्षकांनी नकार दिला. गृहराज्यमंत्री केसरकरांच्या दबावाखाली पोलिस काम करत आहेत. तक्रार घेण्यासाठी 18 तास प्रतीक्षा करावी लागते. स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांवर दोन तासात गुन्हे दाखल होतात. मारहाण करणारे शिवसेनेचे कार्यकर्ते मोकाट सुटतात. गृहराज्यमंत्री त्यांचे असतील तर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊ, असेही राणेनी सांगितले.
 
संबंधित लेख