ilicte liquor sale continues after ajit pawar`s remarks | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

अजित पवारांनी सूचना करुनही कटफळमधील अवैध दारू विक्री थांबेना 

संतोष आटोळे
सोमवार, 14 मे 2018

शिर्सुफळ : बारामती औद्योगिक वसाहती लगत असलेल्या कटफळ येथील परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे. याबाबत स्थानिक कार्यक्रमाला आल्यानंतर राज्याचे माजी उपमुख्यामंत्री यांच्याकडे तक्रार केल्यावर त्यांनी ठोस कार्यवाहीच्या सुचना केली होती. मात्र याकडे स्थानिक पोलिस प्रशासन कानाडोळा करत आहे. आता ग्रामस्थांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार व जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांना अवैध दारुविक्री थांबवण्याचे साकडे घातले आहे.
 

शिर्सुफळ : बारामती औद्योगिक वसाहती लगत असलेल्या कटफळ येथील परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे. याबाबत स्थानिक कार्यक्रमाला आल्यानंतर राज्याचे माजी उपमुख्यामंत्री यांच्याकडे तक्रार केल्यावर त्यांनी ठोस कार्यवाहीच्या सुचना केली होती. मात्र याकडे स्थानिक पोलिस प्रशासन कानाडोळा करत आहे. आता ग्रामस्थांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार व जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांना अवैध दारुविक्री थांबवण्याचे साकडे घातले आहे.
 
कटफळ येथुन बाऊली कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका पत्र्याचे शेडमधुन खुलेआम अवैध रित्या हातभट्टीची दारू विक्री केली जाते. यामुळे औद्योगिक वसाहतीमधील कामगार व युवक, ग्रामस्थ यांना दारूचे व्यसन जडले आहे. दारूला ग्राहकांची गर्दी चांगली असल्यामुळे तसेच आर्थिक उत्पन्नही मोठ्या प्रमाणात मिळत आहे. बाहेर गावांहुन आलेल्या अनेक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्‍तींचा सहभाग या व्यवसायात आहे. तसेच यापूर्वी ग्रामस्थांनी अवैध दारुचा साठा पोलिसांना पकडून दिला होता. मात्र पुढे त्यावर ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. 

तसेच या ठिकाणहुन अनेक मद्यपी मद्य प्राशन करून सार्वजिनक ठिकाणी गोंधळ, रस्त्याने ये-जा करणाऱ्या महिला, कामगार, विद्यार्थी व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. कामगार व युवक दारूच्या व्यसनात गुरफटल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. व्यसन करणाऱ्यांच्या घरात भांडणाचे प्रकार वाढले आहेत. मागील वर्षी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार कटफळला आले होते तेव्हा ग्रामस्थांनी भर सभेत अवैध दारुविक्रीबाबत कारवाईची मागणी केली होती.ते व्हा पवार यांनी यावर ठोस कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. तरीही अवैध दारुविक्री कायमस्वरुपी बंद झाली नाही. 

दरम्यान अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार व जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार हे काल (ता.13) रोजी जलसंधारण कामाच्या शुभारंभाप्रसंगी गावात आले होते. यावेळी त्याच परिसरात कामाची सुरवात होणार होती. यामुळे दारू विक्रेत्यांनी काही काळासाठी तेथुन पळ काढला. तेव्हा ग्रामस्थांनी दारू विक्री ठिकाण व सध्य परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली व कारवाईची मागणी केली. यामुळे आता तरी या अवैध दारुविक्रीवर कायमस्वरुपी कारवाई होईल अशी अपेक्षा ग्रामस्थांमधुन व्यक्त होत आहे. 

प्लास्टिक बंदी दारुविक्रीत पायदळी 

एकीएके बारामती तालुक्‍याच्या शहरी तसेच ग्रामीण भागात प्लास्टिक बंदीसाठी विविध उपाययोजनांसह कारवाईही केली जात आहे. असे असताना कटफळ येथील होत असलेल्या अवैध हातभट्टीच्या दारुविक्रीसाठी सर्रास प्लास्टिक पिशवीचा वापर होत असल्याचे पाहायला मिळाले. दारू विक्रेत्यांकडून `मलिदा` मिळत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलिसांकडुन कानाडोळा केला जात असल्याची माहिती ग्रामस्थांनी पवार यांना दिली. 
 

संबंधित लेख