राम मंदिर तुम्ही बांधता की आम्ही बांधू ? ठाकरेंचा मोदींना सवाल 

बाबरी मशीद पडल्यानंतर हे शेपटी घालून पळाले . बिळात जाऊन ठाकले . देशद्रोह्यांचा आगडोंब उसळला होता तेंव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यांचा सामना केला होता हा इतिहास आहे .-उद्धव ठाकरे
UDDHAV-THAKRE-NARENDRA-MODI
UDDHAV-THAKRE-NARENDRA-MODI

मुंबई : " आमची सत्ता येताच राम मंदिर बाधू असे भाजपने आश्वासन दिले होते . चार वर्षे झाली पण तुम्ही काहीच केले नाही . येत्या २५ नोव्हेंबरला  मी स्वतः अयोध्येत जाणार आहे. तेथून तुम्हाला प्रश्न विचारीन . राम मंदिर तुम्ही बांधता की आम्ही बांधायचे ते सांगा . आम्ही बांधून दाखवू ," असा इशारा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे . 

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते . उद्धव ठाकरे ठाकरे म्हणाले ," पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभर हिंडतात . अमेरिका , जपान , रशिया एवढेच काय भूगोलाच्या पुस्तकात नकाशावरही लवकर न सापडणाऱ्या देशांना हे जाऊन आले . पण गेल्या चार वर्षात एकदाही अयोध्येला हे गेले नाहीत . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे मी अभिनंदन करतो , त्यांनी राम मंदिर कधी बांधणार हा मुद्दा उपस्थित केला आहे . मंदिर वही  बनायेंगे म्हणत यांनी सभा घेतल्या , यात्रा काढल्या . पण पुढे काही नाही. लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपती करायचे तर त्यावेळी नेमकी बाबरीची फाईल न्यायालयात वर येते? ."

बाबरी  मशीद शिवसैनिकानीं  पाडली याचा पुनरुच्चार करीत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले , " बाबरी मशीद  पडल्यानंतर हे शेपटी घालून पळाले . बिळात जाऊन ठाकले . देशद्रोह्यांचा आगडोंब उसळला होता तेंव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यांचा सामना केला होता हा इतिहास आहे . तुम्ही राम मंदिर बांधणार की नाही ते सांगा . नाही तर हा देखील चुनावी जुमला होता हे कबुल करा . तुम्ही बोलत नाही पण मी २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाणार  आहे . तुमचा पराभव व्हावा अशी आमची इच्छा नाही पण तुम्ही दिलेली आश्वासने पाळा  असा आमचा आग्रह आहे . "

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com