If it comes to that I will sale my land , but defeat Ram Shinde | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

प्रसंगी जमिनी विकू, पण प्रा. राम शिंदेंना पाडू  

मुरलीधर कराळे
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

पक्षाने लवकर उमेदवारी निश्चित करावीभाजपच्या प्राराम शिंदे यांचा समाचार घेण्यासाठी प्रसंगी आपण जमिनी विकू पण त्यांचा पराभव करू. 

- राजेंद्र गुंड

नगर :  आपल्या उमेदवारीसाठी लोकांनी उठविलेल्या वावड्या आहेतमला पक्षाने जिल्हाध्यक्षपद देवून भरभरून दिले आहेमी कोणतीही उमेदवारी करणार नाहीअसे एका कार्यक्रमात जाहीर करून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी कर्जत-जामखेड मतदार संघात विधानसभेसाठी कोणाला वाट मोकळी करून दिलीयाबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.

फाळके यांची नुकतीच जिल्हाध्यक्षपदी निवड झालीखरं तर ही निवड म्हणजेच पक्षाकडून विधानसभेचा त्यांचा पत्ता कट केलाअसा अर्थ काढला जात होतात्यानंतरही ते विधानसभेसाठी उमेदवारी करतीलअशी चर्चा सुरू झालीमात्र कर्जतमध्ये एका मेळाव्यात त्यांनी या विषयाला तोंड फोडलेमला जिल्हाध्यक्ष करून पक्षाने भरभरून दिलेमी त्यात समाधानी आहेसध्या तरी कोणतीही निवडणूक लढविणार नाहीअसे सांगून त्यांनी स्वतः विधानसभेसाठी उमेदवारी करणार नसल्याचे सांगून टाकलेत्यामुळे राष्ट्रवादी-काॅग्रेसच्या आघाडीत फाळके यांचा पत्ता कट झाल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

आघाडीकडून उमेदवारी करणाऱ्या उमेदवाराला भारतीय जनता पक्षाच्या प्राराम शिंदे यांच्याशी टक्कर द्यावी लागणार आहेशिंदे यांच्या ताब्यात मतदार संघातील बहुतेक महत्त्वाच्या सत्ता आहेतजामखेड नगरपालिकेवर शिंदे यांचेच वर्चस्व आहेकर्जतमध्येही त्यांचा चांगलाच बोलबाला आहेया पार्श्वभूमीवर शिंदे यांना तोंड देणारा उमेदवार कोण असेलयाबाबत आता उत्सुकता आहेफाळके यांच्याकडे जोपर्यंत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद नव्हतेतोपर्यंत फाळके उमेदवार होऊ शकतीलअसे सांगितले जात होतेमात्र आता जिल्हाध्यक्षपद आल्याने ते उमेदवारी करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहेत्यामुळे प्राशिंदे यांना सक्षमपणे कोण तोंड देणारहे काळच ठरविणार आहे.

फाळके यांच्या भूमिकेमुळे महिला राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड यांचा उमेदवारीचा मार्ग आता अधिक सुकर झाला आहेकर्जतमधील त्याच मेळाव्यात गुंड यांचे पती पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र गुंड यांनी  आपली भूमिका मांडलीपक्षाने लवकर उमेदवारी निश्चित करावीभाजपच्या प्राराम शिंदे यांचा समाचार घेण्यासाठी प्रसंगी आपण जमिनी विकू पण त्यांचा पराभव करूअसे सांगून गुंड कुटुंबिय उमेदवारीच्या तयारीत असल्याचे त्यांनी सूचित केले.

दरम्यानआघाडीकडून उमेदवारीसाठी काॅंग्रेसचे नेतेही तयारीला लागले आहेतकाॅंग्रेसच्या जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालिका मिनाक्षी साळुंकेतालुकाध्यक्ष प्राकिरण पाटील यांनीही तयारी केली आहेत्यामुळे फाळके यांच्या भूमिकेने अनेकांचे मार्ग सुकर झाले आहेत.

 

संबंधित लेख