मी पत्ता ओपन केल्यास आमदार सोनवणेंची पळता भुई होईल : आशा बुचके

मी पत्ता ओपन केल्यास आमदार सोनवणेंची पळता भुई होईल : आशा बुचके

नारायणगाव : मी पत्ता ओपन केल्यास आमदार शरद सोनवणेंची पळता भुई थोडी होईल. त्यांना रस्त्यावर फिरणे मुश्‍कील होईल.थोडे थांबा मी अस्त्र बाहेर काढते. आमचा नाद करायचा नाही, असा इशारा शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांनी नारायणगाव येथील सभेत दिला.
 
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत येथील जुन्या पुणे नाशिक महामार्गाच्या 5.37 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नामुळे 22 कोटी 94 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन खासदार आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच योगेश पाटे होते.या वेळी झालेल्या सभेत बुचके यांनी आमदार सोनवणे यांच्यावर टीका केली. बुचके म्हणाल्या दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याचे काम जुन्नर तालुक्‍यात सुरू आहे. खोटे आरोप करुन खासदार आढळरावांची बदनामी केली जात आहे. या पुढे खासदारांची बदनामी सहन करणार नाही.

शिवसेनेचे तालुका अध्यक्ष खंडागळे म्हणाले की टोलचा झोल कुणी केला? विकास कामाच्या भूलथापा मारल्या जात आहे. सोयीचे राजकारण केले जात आहे. खासदार आढळराव पाटील यांनी आदिवासी भागाकडे दुर्लक्ष केले, असा आरोप केला जात आहे. खासदारांनी पंतप्रधान सडक योजनेतून आदिवासी भागात शंभर कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. खासदार आढळराव पाटील चौथ्यांदा निवडून येतील.
भाजपचे तालुका अध्यक्ष भगवान घोलप म्हणाले चाळकवाडी येथील टोल बंद करणाऱ्यांनीच टोल सुरू केला. या मागचा तुमचा उद्देश काय याचे उत्तर द्या. जनतेची दिशाभूल करू नका.

या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माजी विधान सभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील,आमदार शरद सोनवणे,देवदत्त निकम यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की भीमाशंकर देवस्थानचे अनेक वर्ष अध्यक्ष असताना विकास आरखडयाला निधी आणता आला नाही. भीमाशंकर विकासासाठी 148 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. वाहतूक कोंडीमुळे हिंजवडीमधील 56 कंपन्यांनी गाशा गुंडाळला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते बोलत नाहीत. मी कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली आहेत. विरोधक सोशल मिडियाच्या माध्यमातून माझ्या विरोधात अपप्रचार करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com