If I hadn't used abusive language , there would have been murder | Sarkarnama

अर्वाच्य भाषा वापरली नसती, तर तिथे खून झाला असता- अब्दुल सत्तार

सरकारनामा ब्युुरो
बुधवार, 14 जून 2017

औरंगाबाद :  चोवीस वर्षापुर्वी झालेल्या त्या शेती व्यवहाराचा मी साक्षीदार आहे, सकाळी माझ्या शेतात गेलो तेव्हा शेख मुख्तार शेख सत्तार आणि सपकाळ, कल्याणकर यांच्यात जमीनीवरून वाद सुरु होता. वाद विकोपाला जाऊन काहीतरी विपरीत घडेल याचा अंदाज आल्यानेच मी मध्यस्थी करायला गेलो होतो . 

औरंगाबाद :  चोवीस वर्षापुर्वी झालेल्या त्या शेती व्यवहाराचा मी साक्षीदार आहे, सकाळी माझ्या शेतात गेलो तेव्हा शेख मुख्तार शेख सत्तार आणि सपकाळ, कल्याणकर यांच्यात जमीनीवरून वाद सुरु होता. वाद विकोपाला जाऊन काहीतरी विपरीत घडेल याचा अंदाज आल्यानेच मी मध्यस्थी करायला गेलो होतो . 

लोकप्रतिनिधी म्हणून मी शिवीगाळ करणे किंवा अर्वाच्य भाषा वापरणे योग्य नाहीच, त्याबद्दल मी माफी मागतो. पण मी तशी भाषा वापरली नसती तर वादातून एखाद्याचा खून झाला असता असे स्पष्टीकरण देत आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रकरण अंगलट येताच सावरासावर केली.

सिल्लोड तालुक्‍यातील दहिगाव शिवारात शेख मुख्तार शेख सत्तार व इतरांना आमदार सत्तार यांनी शेतात जाऊन मारहाण व शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ आज  व्हायरल झाला होता. याप्रकरणी अब्दुल सत्तार यांनी  पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. 

 

वाद झाला त्या जमिनीशी माझा काडीचा संबंध
नाही, परंतु ही जमीन खरेदी केली ते लक्ष्मण कल्याणकर व विठ्ठल सपकाळ हे माझ्या परिचयाचे व नगरपरिषदेतील नगरसेवक आहेत. लक्ष्मण कल्याणकर यांचे वडील सखाराम कल्याणकर व शेख मुख्तार शेख सत्तार यांच्या वडीलांमध्ये या शेतीचा व्यवहार झाला होता. त्यात मी मध्यस्थ होतो, शिवाय या जमिनीला खेटूनच माझी शेती आहे.

 शेख मुख्तार यास कल्याणकर व सपकाळ यांनी प्रत्येकी
अडीच लाख रुपये जमीन खरेदीसाठी दिले होते. मंगळवारी सकाळी मी शेतात गेलो तेव्हा कल्याणकर, सपकाळ व मुख्तार यांच्यात वादावादी सुरु होती. भांडण विकोपाला जाऊन काहीही घडू शकते यांचा अंदाज आल्यामुळेच मी यात उडी घेतली. अन्यथा माझा त्या जमीनीशी काहीही संबंध नाही, मग ती हडपण्याचा प्रश्‍नच कुठे येतो असा उलट सवाल सत्तार यांनी केला.

संबंधित लेख