गणेशोत्सवात दारू प्याल, तर तुरुंगात जाल : गिरीश बापट 

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव साजरा करण्यास सुरवात केली. पण या उत्सवाचा खरा हेतू साध्य होताना आज दिसत नाही.-गिरीश बापट
Girish Bapat
Girish Bapat

पिंपरी :  "यावर्षीचा गणेशोत्सव दणक्‍यात करा, पण तो डीजे, डॉल्बी आणि दारुमुक्तही हवा .  उत्सवकाळात दारू प्याल  ,तर तुरुंगात जाल," असा इशारा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी  पिंपरी-चिंचवडमध्ये  दिला. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धा बक्षीस वितरण समारंभात बापट बोलत होते. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, नगरसेविका शारदा सोनवणे, भाजपचे प्रवक्ते अमोल थोरात आदी यावेळी उपस्थित होते. 

या कार्यक्रमाला लांडगे व जगताप हे बापट यांच्या दोन्ही बाजूंना बसले होते. हा धागा पकडून या दोघांच्या मध्ये माझा जीव गुदमरतो की काय असे वाटले होते. पण, गोडसे आले आणि माझ्यावरील विघ्न दूर झाले, अशी कोटी बापट यांनी करताच हशा पिकला. तसेच कल्पना न देताही महेश चांगला बोलला. असे बोलल्यानंतर थोडे थांबून भाषणाची कल्पना असे मला म्हणायचे होते, असे नेहमीच्या शैलीत बापट म्हणताच हास्यस्फोट झाला. 

बापट म्हणाले,"गणरायाच्या आगमन आणि विसर्जनाच्या वेळी काही उत्साही कार्यकर्त्यांचा मद्यपान करून धिंगाणा सुरू असतो. त्यामुळे उत्सवाला गालबोट लागते. याचे भान प्रत्येक कार्यकर्त्यांना हवे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव साजरा करण्यास सुरवात केली. पण या उत्सवाचा खरा हेतू साध्य होताना आज दिसत नाही."

"धार्मिक सण साजरे करताना प्रत्येकाने अन्य धर्माचा अनादर होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच या उत्सवांमध्ये सुरक्षितताही महत्त्वाची आहे. कारण समाजकंटक धार्मिक तेढ निर्माण करून जाती-धर्मामध्ये विष पेरण्यासाठी टपलेलेच आहेत.त्यामुळे सामाजिक सलोखा व जातीय सलोखा ठेवून येथील शांतता कायम ठेवून गणेशोत्सव साजरा करा''.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com