If court orders are not obeyed then what is the use of courts: Raj Thakre | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

न्यायालयाचे आदेश झुगारले जात असतील ,तर न्यायालये हवीत कशाला  : राज ठाकरे 

समीर सुर्वे
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

महापौरांसाठी बंगला असावा, यासाठी बाळासाहेबांनी संघर्ष केला होता. त्या बंगल्यातूनच महापौरांना बाहेर काढले जात आहे. 

-राज ठाकरे

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कोणतीही सरकारी जागा स्मारकासाठी देता येत नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरही रेल्वेस्थानक परिसरात फेरीवाले बसत आहेत. न्यायालयाचे आदेश असे झुगारले जात असल्यास ती कशाला हवीत ?" असा  असा प्रश्‍न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे . 

रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाले आणि दादर येथील प्रस्तावित महापौर निवासस्थानाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ठाकरे यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  
  

राज ठाकरे म्हणाले," आम्ही आंदोलन केल्यावर रेल्वेस्थानक परिसरात 150 मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसवू देऊ नका, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर स्थानक परिसरांनी मोकळा श्‍वास घेतला होता. मात्र, पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे तेथे पुन्हा फेरीवाले बसत आहेत. त्यांना न हटवल्यास पुन्हा आंदोलन करू, असा इशारा ठाकरे यांनी पालिकेला दिला."  

"महापौरांसाठी बंगला असावा, यासाठी बाळासाहेबांनी संघर्ष केला होता,बाहेर त्या बंगल्यातूनच महापौरांना बाहेर   पडावे लागणे अयोग्य आहे . मुंबईच्या  महापौरांना निवासस्थानासाठी वणवण भटकावे लागतंय , ही महापौरपदाची थट्टा आहे," अशी टीका राज ठाकरे यांनी  केली . 

"शहरातील विकासकांना भूखंड वाटले जातात; पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी भूखंड मिळत नाही, हे दुर्दैव आहे. महापौरांचा बंगला बाळासाहेबांच्या स्मारकाच्या नावाने कुणाच्या तरी हितासाठी गिळला जातो.  " असे सांगून राज ठाकरे पुढे म्हणाले ,  "शिवाजी पार्क येथील जिमखान्याची जागा टेनिस आणि बॅडमिंटन कोर्टसाठी राखीव आहे. तेथे अनेक वर्षांपासून हे खेळ खेळले जातात. तेथे प्रस्तावित महापौर निवासस्थान होऊ देणार नाही."

"मुंबईसारख्या शहरातील महापौर निवासस्थानासाठी वणवण भटकत आहे. ही महापौरपदाची थट्टा आहे. राज्यात बाळासाहेबांच्या स्मारकासाठी कुठेही जागा उपलब्ध होऊ शकेल. महापौर निवासासारख्या वास्तूंवर अधिकार सांगत सत्ताधारी चुकीचा पायंडा पाडत आहेत. महापौरांसाठी बंगला असावा, यासाठी बाळासाहेबांनी संघर्ष केला होता. त्या बंगल्यातूनच महापौरांना बाहेर काढले जात आहे," असा टोलाही त्यांनी लगावला.

संबंधित लेख